Dagadusheth Halwai Ganapati Decoration Sakal
लाइफस्टाइल

Dagadusheth Halwai Ganapati Decoration: यंदा दगडूशेठ गणरायाला साकारणार जटोली शिवमंदिराचा देखावा, जाणून घ्या वैशिष्ट्य

यंदा गणेशोत्सवादरम्यान दगडूशेठ गणपती मंदिराला आशियातील सर्वात उंच जटोली शिवमंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे.

पुजा बोनकिले

देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. सर्व गणेशभक्त मोठ्या आतुरतेने गणरायाच्या आगमनाची वाट पाहतात. पुण्यातील दगडूशे गणपतीचा यंदाचा देखावा कसा असणार याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरूण मंडळाच्या ट्रस्टतर्फे आशियातील सर्वात उंच जटोली शिवमंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा १३२ वे गणेशोत्सवाचे वर्षे आहे. यामुळे यंदा मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमधील शिवमंदिराची प्रतिकृती पुण्यात पाहता येणार आहे.

मिळालेल्या महितीनुसार दगडूशेठ गणरायाच्या देखाव्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. यंदा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. देखावा अशापद्धतीने करण्यात येणार आहे की ज्यामुळे भाविकांना लांबून सहज बाप्पाचे दर्शन घेता येईल.

jatoli tallest shiva temple

हिमालयाच्या कुशीत वसलेले जटोली शिवमंदिर आशियातील सर्वात उंच मंदिर आहे. या मंदिराविषयी असे बोलले जाते की दगडांना स्पर्श केल्यास डमरूचा आवाज येतो. येथे देश विदेशीतून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात.

jatoli tallest shiva temple

या मंदिराची उंची सुमारे १११ फूट असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर चमत्कारी मानले जाते. कारण या मंदिराच्या दगडांना हात लावल्यास डमरूचा आवाज येतो. महादेवाच्या या भव्य मंदिरात देवी-देवतांच्या मुर्ती स्थापित आहेत. या मंदिरात स्फटिकाचे शिवलिंग आहे. तसेच माता पार्वतीची मुर्ती स्थापित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT