Dark Circle Remedy: Sakal
लाइफस्टाइल

Dark Circle Remedy: प्रियांका चोप्राची आई मधु चोप्राने दिलेल्या टिप्सने दूर होतील डोळ्याखालील काळे डाग

Dark Circle Remedy: जर तुम्हाला डोळ्यांखालील काळे डाग कमी करायचे असेल तर प्रयांका चोप्राच्या आईने दिलेल्या घरगुती टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Dark Circle Remedy: अनेक मुलींना डोळ्यांखाली काळे डाग असणे ही समस्या त्रास देते. वाढत्या वयातही ही समस्या अनेक महिलांना उद्भवते. अशावेळी घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येते. प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांनी इंस्टाग्राम पेजवर डोळ्यांखालील काळे डाग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहे. हे उपाय कोणते आहेत हे जाणून घेऊया.

दुधाची साय

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डॉ. मधु चोप्रा यांनी दुधाची साय लावण्याचा सल्ला दिला आहे. बोटांच्या मदतीने ही साय डोळ्यांखाली आण वरच्या भागावर लावावे. डोळ्यांखालील काळे डाग काही दिवसांमध्ये कमी होतील.

ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबपाणी

साय लावल्यानंतर आठवडाभर दररोज रात्री झोपण्यापुर्वी लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचे मिक्स करून लावावे. यामुळे काही दिवसातच डोळ्याखालील काळे डाग कमी होतील. यासाठी एक चमचा ग्लिसरीनमध्ये चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिक्सळा आणि त्यात गुलाबजल मिक्स करा आणि कापसाच्या मदतीने डाळ्याखाली लावा. एक ते दीड तासांनंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

सकाळी पुन्हा एकदा साय लावावी. नियमितपणे डोळ्याखाली साय लावावी. लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाबजल यांचे मिश्रण आठवड्यातून दोनदाच लावावे. हे दोन उपाय डोळ्यांखालील काळे डाग कमी करण्यास मदत करतील.

व्हिटॅमिन ई लावा

आय पॅक काढल्यानंतर व्हिटॅमिन ई मिक्स अंडर आय क्रीम देखील लावा. ते रोज लावल्याने काही दिवसातच डोळ्याखालील काळे डाग कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT