लाइफस्टाइल

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला आपल्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा, पाठवा हे खास संदेश!

तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा धनत्रयोदशीच्या मराठी शुभेच्छा

Aishwarya Musale

देशभरात दिवाळीच्या उत्सवांमध्ये धनत्रयोदशी हा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते.

दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्सवाचा सण… चार ते पाच दिवसांचा दिवाळसण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण जल्लोषात साजरा करतात. वसूबारसनंतर धनत्रयोदशी येते. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. तुमच्या प्रियजनांना तुम्ही खास मराठीतून शुभेच्छा देऊ शकतात

1. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

2. आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

3. धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

4. धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

5. लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

6. धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन, लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

7. दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

8. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

9. धनत्रयोदशीच्या शुभदिनी, आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची, करोनी औचित्य दिपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

10. माता लक्ष्मीची कृपा आपणांवर सदैव राहू दे… यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

11. दारी दिव्यांची आरास, अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, हर्षून गेले मन, आला आला दिवाळीचा सण, करा प्रेमाची उधळण…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

12. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद आणि नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

13. दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

14. दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी… घरी नांदू दे सुख समृद्धी….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा ! 

15. लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

SCROLL FOR NEXT