Goa Travel esakal
लाइफस्टाइल

Goa Travel : गोव्यातील 'या' बेटासमोर बालीचे सौंदर्य पडेल फिके, एकदा भेट द्याल तर पुन्हा जाल!

Goa Travel : भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये गोव्याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. गोव्याचे सौंदर्य एवढे अप्रतिम आहे की, दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक गोव्याला आवर्जून भेट देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Goa Travel : भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये गोव्याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. गोव्याचे सौंदर्य एवढे अप्रतिम आहे की, दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक गोव्याला आवर्जून भेट देतात. गोव्यात अशी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे दररोज कित्येक लोक आपल्या कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येतात.

गोव्यातील समद्रकिनारे, किल्ले, चर्च, मंदिरे येथील नाईट लाईफ आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. खास करून येथील सुप्रसिद्ध समुद्रकिनारे जसे की, कळंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच इत्यादी समुद्रकिनारे अनेकांना माहित असतीलच. मात्र, या समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त गोव्यात एक असे अप्रतिम बेट आहे, ज्याच्यासमोर बालीचे सौंदर्य ही फिके पडेल. कोणते आहे हे बेट? चला तर मग जाणून घेऊयात.

दिवार बेट कुठे आहे ?

दिवार हे बेट गोव्यामध्ये स्थित असून ते चहुबाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून १० किमी अंतरावर हे मनमोहक बेट स्थित आहे. हे बेट घनदाट जंगल, निसर्गाचे सौंदर्य आणि पाण्याने वेढलेले आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला स्वर्गात आल्यासारखी अनुभूती येईल, यात काही शंका नाही.

diwar island

या बेटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. तुम्हाला या ठिकाणी जायचे असल्यास, जुन्या गोव्यातून केवळ फेरी बोटीद्वारे तुम्ही या बेटावर जाऊ शकता. या बेटावर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता अनुभवायला मिळेल. गोव्यात आल्यावर तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला काहीच हरकत नाही.

विशेष म्हणजे या बेटाला ऐतिहासिक वारसा लाभला असून या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. येथे स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या तुम्हाला दिसून येईल. (where is diwar island)

दिवार बेटावर घालवा निवांत वेळ

दिवार बेट हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा ही काही कमी नाही. जर तुम्हाला रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक हवा असेल, तर त्यासाठी दिवार बेट हा उत्तम ऑप्शन आहे. येथील शांततापूर्ण वातावरणात तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. हे बेट दिसायला जरी लहान असले तरी हा परिसर निसर्गसंपन्न आहे. छोटी-मोठी झाडे, विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला नक्कीच भुरळ घालतील.

Diwar Island

दिवार बेटावर तुम्ही सायकलिंग आणि बोटिंग देखील करू शकता. सायकलिंग आणि बोटिंगसाठी दिवार हे बेट सुप्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक येथे खास सायकलिंग आणि बोटिंग करण्यासाठी येतात. यासोबतच येथील विविध प्रकारची मंदिरे, पोर्तुगीज शैलीतील घरे पाहण्यासारखी आहेत. (spends relaxing time at Diwar Island)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: दहा औषध उत्पादकांचे परवाने रद्द; ४३४ संस्थांची तपासणी; १३५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ‘मुख्य नेता’पद आधारहीन; उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात दावा

Delhi to Pune SpiceJet विमानात नेमकं काय घडलं? प्रवाशांना श्वास घेणंही कठीण, विमान रणवेवर पोहोचलं अन् प्रवाशांनी उड्डाणच रोखल

Marathi News Live Updates : रीलच्या नादात १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Maharashtra Agriculture Department: कृषी विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; सतरा वर्षांनंतर फेररचना; २,६६८ नवीन पदांची निर्मिती

SCROLL FOR NEXT