Diwali Sari Looks esakal
लाइफस्टाइल

Diwali Sari Looks : दिवाळीत सिंपल आणि एलिगंट लूक हवा आहे? मग, ट्राय करा 'हे' साडी लूक्स

नेहमीच पारंपारिक साडी लूक ट्राय करण्यापेक्षा एलिगंट साडी लूक एकदा करून बघा.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Sari Look : दिवाळीला नुकतीच सुरूवात झाली आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात धनत्रयोदशीचा सण आहे. हा सण आपल्या भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. आजच्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि  भगवान कुबेर यांची पूजा केली जाते.

या पूजेसाठी महिलांची विशेष लूकला पसंती असते. दिवाळीमध्ये साडीचा लूक हा हमखास केला जातो. साडी शिवाय महिलांची दिवाळी पूर्ण होऊच शकणार नाही, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

यंदाच्या दिवाळीला आणि खास धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही सिंपल, एलिगंट आणि आकर्षक साडी लूक रिक्रिएट करू शकता. त्यासाठी, तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या साडी लूक्सवर एक नजर फिरवावी लागेल. कोणते आहेत हे साडी लूक्स? चला तर मग जाणून घेऊयात.

हेव्ही ब्लाऊज आणि प्लेन साडी

खास दिवाळीसाठी तुम्हाला एलिगंट आणि ग्रेसफूल लूक हवा असेल तर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा हा साडी लूक एकदम बेस्ट आहे. कतरिनाने हेव्ही ब्लाऊज आणि प्लेन साडीसोबत हा लूक कॅरी केला आहे.

जर तुम्हाला ही दिवाळीमध्ये फार भडक आणि चमकदार लूक करायचा नसेल तर तुमच्यासाठी कतरिनाचा हा साडी लूक बेस्ट आहे. मिरर वर्कचा ब्लाऊज आणि कोणत्याही रंगाची प्लेन साडी, मिनिमल मेकअप, हेव्ही कानातले आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल हे सर्व जमून आलं की दिवाळीसाठी तुमचा लूक तयार आहे.

फ्लॉवर प्रिंट

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने मागील काही दिवसांपूर्वी तिचा हा साडी लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने लाल फुलांची प्रिंट असलेली सुंदर पांढरी साडी नेसली होती.

या साडीमध्ये तिचा एलिगंट लूक पहायला मिळत आहे. या साडीसोबत तिने गोल्डन ज्वेलरी कॅरी केली आहे. हातात बांगड्या, गळ्यात चोकर आणि मिनिमल मेकअप असा लूक तिने केला होता. दिवाळीसाठी तुम्ही सुद्धा क्रितीच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता.

एम्ब्रॉयडरी साडी लूक

बॉलिवूड अभिनेत्री किआरा अडवाणी तिच्या फॅशन सेन्ससाठी खास ओळखली जाते. तिचे साडी लूक्स नेहमीच आपले लक्ष वेधून घेतात. तिने केलेला हा एम्ब्रॉयडरी साडी लूक दिवाळीसाठी एकदम बेस्ट आहे.

दिवाळीमध्ये तुम्हाला जर सिंपल, एलिगंट आणि छान बॉर्डर असलेला साडी लूक करायचा असेल तर किआराचा हा लूक तुमच्यासाठी बेस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT