लाइफस्टाइल

BhauBeej 2023 :बहिण भावांच्या नात्याचा सण देशात वेगवेगळ्या नावांनी केला जातो साजरा!

भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.

Aishwarya Musale

भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सणही भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. 

भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. खरं तर, भारतातील विविधता आणि संस्कृतीमुळे सणांची नावे थोडी बदलली असली तरी अर्थ आणि महत्त्व मात्र तेच आहे. चला तर भारताच्या विविध भागात भाऊबीज कशाप्रकारे साजरी केली जाते ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील भाऊबीज

महाराष्ट्र आणि गोव्यात भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी बहिण भावाला औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो यासह यथोचीत भेटवस्तूही देतो.

पश्चिम बंगालमधील भाई फोटा

भाऊबीज हा सण पश्चिम बंगालमध्ये 'भाई फोटा' उत्सव म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहिणी उपवास ठेवतात आणि भावाचे औक्षण करुनच भोजन करतात. औक्षणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

उत्तर प्रदेशातील भाई दूज उत्सव

उत्तर प्रदेशात भाऊबीज 'भाई दूज'च्या नावाने ओळखली जाते. यानिमित्ताने बहिणी आपल्या भावांना औक्षण करुन साखरेचे बत्तासे खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात भाऊबीजेला सुके खोबरे देण्याची परंपरा आहे.

बिहारमध्ये तर अनोखी परंपरा

भाऊबीजेच्या दिवशी बिहारमध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते. या दिवशी बहिणी भावांना फटकारतात आणि त्यांना चांगले-वाईट बोलतात आणि नंतर त्यांची माफी मागतात. येथील नागरिक सांगतात, ही परंपरा भाऊंनी भूतकाळात केलेल्या चुकांमुळे पाळली जाते. या नंतर बहिणी आपल्या भावांना औक्षण करुन मिठाई खाऊ घालतात.

नेपाळ मध्येही साजरी होते भाऊबीजेची 'भाई तिहार'

भाऊबीज नेपाळमध्ये 'भाई तिहार' म्हणून प्रसिद्ध आहे. तिहार म्हणजे कपाळी लावला जाणारा कुंकवाचा टिळा. याशिवाय येथे भाऊबीज 'भाई टिका' नावाने साजरा केला जातो. नेपाळमध्ये या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर सात रंगांचा टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

देशाच्या विविध भागात भाऊबीज हा सण जरी आपल्या स्थानिक परंपरेनुसार साजरा केला जात असला तरी यात एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे भावा-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम.

प्रत्येक ठिकाणी या सणाला नाव वेगळी आहेत मात्र बहिणीचे भावाला दीर्घायुष्य, सुख-समृद्धीसाठी औक्षण करणे, भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देणे हे सर्वत्र एकसारखंच आहे. अशा भावा-बहिणीच्या पवित्र नात्याची गाठ अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्व बहिण- भावांना हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT