Outfit  sakal
लाइफस्टाइल

Diwali Outfit Ideas: टिशू साडीमुळे खुलेल सौंदर्य, जाणून घ्या फॅशन ट्रेंड

आजकाल टिशू साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय.

Aishwarya Musale

महिला असो वा तरुणी असो प्रत्येकीला साडी नेसायची आवड असते. खास करून तरुणी वजनानं हलक्या असणाऱ्या साड्यांना प्राधान्य देतात. तरुणींची हीच आवड पूर्ण करणारा हटके प्रकार म्हणजे टिशू साडी. हा दिवाळीच्या दृष्टीनं उत्तम पर्याय आहे.

त्याचबरोबर फॅशनचे युग झपाट्याने बदलत असून बाजारात काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, अनेक जुने पॅटर्न आणि स्टाइल पुन्हा एकदा नवीनतम फॅशनमध्ये दिसतात.

या दिवसांबद्दल बोलायचे झाले तर, टिश्यू साडीला खूप पसंती दिली जात आहे, परंतु प्रत्येकजण ती योग्य प्रकारे स्टाईल करू शकत नाही. तर, आज आम्ही तुम्हाला टिश्यू साडीच्या काही खास डिझाइन्स दाखवणार आहोत ज्या तुम्ही सणासुदीपासून लग्नापर्यंत आणि दिवाळीसाठी घालू शकता.

सटल साडी लुक

तुम्ही कोणत्याही फंक्शन किंवा पार्टीसाठी जात असाल तर अशा प्रकारच्या सॉफ्ट पिंक कलरच्या बॉर्डर वर्क चंदेरी टिश्यू साडीला तुम्ही स्टाइल करू शकता. ही सुंदर साडी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे. तुम्हाला अशा प्रकारची साडी 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत सहज मिळू शकते.

गोल्डन कलर साडी 

गोल्डन कलर हा सगळ्यांचा आवडता कलर आहे. दिवाळीच्या सणाला तुम्ही अशा प्रकारची साडी घालू शकता. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, तुम्‍हाला अशीच हॅन्डलूम टिशू साडी जवळपास 2500 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते. हे स्पेशल दिसण्यासाठी हेअर अॅक्सेसरीज म्हणून तुमच्या केसांमध्ये लाल गुलाब स्टाईल करा.

कॉपर कलर साडी

जर तुम्हाला बोल्ड आणि डार्क रंगाची साडी नेसायची असेल तर तुम्ही या प्रकारची हेवी वर्क साडी घालू शकता. तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या बाजारात 3,000 ते 5,000 रुपयांना सहज मिळू शकतात. या प्रकारच्या साडीसह, आपण हिरव्या रंगाचे झुमके घालू शकता आणि लिप्ससाठी रूबी रेड कलर निवडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Done Maharaj Bhakankun : 'अंडरवर्ल्ड डॉनचा खात्मा ते 'भारत हिंदू राष्ट्र होणार...'; श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीत डोणे महाराजांची भाकणूक, तिसऱ्या महायुद्धाबाबतही केली भविष्यवाणी

Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Ratnagiri Alphonso Mango : दिवाळीत चाखायला मिळणार हापूस! रत्नागिरीतील गावखडीत ऑक्टोबरमध्येच आंब्याची पहिली पेटी तयार; 21 हजार रुपयांचा दर अपेक्षित

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

Rahul Gandhi: ‘राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या’; राहुल गांधींचे महारॅलीसाठी देशवासीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT