लाइफस्टाइल

Skin Care : फेस मास्क लावताना 'या' चुका करू नका; चेहऱ्याची चमक होऊ शकते कमी!

फेस मास्क लावताना 'या' चुका करू नका..

Aishwarya Musale

आपला चेहरा सुंदर दिसावा आणि तो चमकदार व नितळ असावा, असे सगळ्यांनाच वाटत असतं. मग त्यासाठी आपण अनेक उपाय वाचत असतो, सोशल मीडियावर पाहत असतो किंवा कोणीतरी त्याबाबत आपल्याला काही घरगुती उपायदेखील सुचवत असतात. चमकदार आणि स्वच्छ त्वचेसाठी चेहऱ्यावर अनेक प्रकारचे फेस मास्क लावले जातात. 

हे फेसमास्क त्वचा तजेलदार आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात. परंतु, फेसपॅकचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अनेकदा मुली फेस पॅक आणि मास्क लावताना काही चुका करतात.

 चेहरा न धुणे

फेसमास्क लावण्यापूर्वी नेहमी हात आणि चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल, घाण साफ होते. अन्यथा त्वचेला फायद्याऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत चांगले परिणाम मिळविण्यासाठी प्रथम हात आणि चेहरा धुवा. फेसमास्क नेहमी स्वच्छ त्वचेवर लावा.

अतिवापर करणे

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चुकीचा असतो. हाच नियम फेसपॅकसाठीही लागू पडतो. जर तुम्ही दररोज फेसपॅकचा वापर केलात, तर त्वचेचा कोरडेपणा वाढणे, चेहरा लाल होणे यांसारखे दुष्परिणाम पाहायला मिळतात.

फेसमास्क जास्त काळ त्वचेवर ठेवू नका

बरेच लोक फेस मास्क लावल्यानंतर बराच वेळ तसेच ठेवतात. हे हानिकारक असू शकते. यामध्ये अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्या तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. यासाठी, फेस मास्क लावण्यापूर्वी, त्याच्या पॅकेजिंगच्या मागील बाजूस दिलेल्या सूचना नीट वाचा आणि त्याचे पालन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT