family sakal
लाइफस्टाइल

ब्रँडेड बालपण ! हॅप्पी पेरेंटिंग

मुलांचं ‘खेळणं’ आता ब्रँडेड कथासूत्रांवर व सोशल मीडियावर आधारित व्हायला लागलंय.

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

सध्याचं जग हे जाहिरातीचे युग झालं आहे. त्यात जाहिरात करताना विशिष्ट ‘ब्रॅंड’ कसे आपल्या डोक्यात घुसवले जातील, यांचा प्रयत्न होतो. त्यात नव्वद टक्के जाहिराती एकतर स्त्रियांकडून किंवा मुलांकडून केल्या जातात. त्यातही लक्षात आलंय, की मुलं- त्यातही छोटी बाळं, शिशूवयातील चिमुरडी मुलं ही सगळ्यात यशस्वी ‘ब्रँड अँबेसडर’ बनतात. आता ‘मुलां’नी जाहिराती करणं योग्य आहे का?, कमी पैशांत काम करून घेतलं जातं, आपल्या पाच सेकंदांच्या मॉडेलिंगमधून आपल्या मुलीत उद्याची सुपरमॉडेल किंवा हिरोईनची स्वप्नं बघणारे स्वप्नाळू पालक या विषयात न शिरता ‘ब्रँडिंग’चा मुलांच्या बालपणावर काय परिणाम होतोय, हे बघूयात!

१.मुलांचं ‘खेळणं’ आता ब्रँडेड कथासूत्रांवर व सोशल मीडियावर आधारित व्हायला लागलंय. बार्बी बाहुलीबरोबर संपूर्ण घर, कपडे इत्यादी सगळं एक‌त्रितपणे मांडलं जातं आणि त्यातून खेळायचं कसं हेही डोक्यात घुसवलं जातं. पुढच्या काळात ती बार्बी मुलींच्या सौंदर्याबद्दलच्या कल्पनाही (चुकीच्या असल्या तरी) ठरवते! अर्थातच भातुकलीच्या खेळातील कल्पनाविश्व, वाट्या-चमचे-चणे-फुटाणे आणि स्वतःला व्यक्त करण्याच्या प्रयत्नांना संधीच मिळत नाही.

२.‘विशिष्ट ब्रॅंडचे कपडे’ - अगदी आतल्या चड्डीपासून टी-शर्टपर्यंत, डोक्याच्या तेलापासून पायातल्या शूजपर्यंत- हे इतक्या प्रभावीपणे मुलांच्या गळी उतरवलं जातं, की मग ‘बालहट्टापोटी’ हे सगळं घरात येतं, इतकंच नाही तर ‘स्टेट्स - सिंबॉल’ बनतं. याचा थेट परिणाम कॉलेजमधल्या मुलामुलींच्या ‘ब्रँडच्या’ अतिरेकी वेडात दिसून येतो.

३.मुलांना समोर ठेवून केलेलं ब्रँडिंग फक्त कपडे-खेळापर्यंत थांबत नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात- विशेषतः शिक्षण क्षेत्रातही घुसलं आहे. विशिष्ट ब्रॅंडच्या क्लासमध्ये शिकलं, की तुम्ही डॉक्टर-इंजिनिअर होणारच, असा आभास निर्माण केला जातो. मग त्यातून शिक्षण प्रचंड महाग होत जातं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या स्वतःहून अभ्यास करण्याची क्षमता विकसितच केली जात नाही.

४.सगळ्यांत काळजीची गोष्ट म्हणजे ‘जगण्याची मूल्यं’सुद्धा ब्रँडिंगच्या आक्रमणात हरवून जातात. यात दुर्दैवानं ‘जे दिसतं तेच खरं’ असं समजणारी बालबुद्धी आणि झापडं लावलेलं प्रेमळ पालकत्व त्याला बळी पडतात आणि मुलांचं बालपणच ‘ब्रॅंडेड’ बनायला लागतं.

पालकमित्रांनो, प्रत्यक्षात प्रत्येक मूल - त्याच्या/तिच्या क्षमता, भावना, व्यक्त करण्याच्या पद्धती - हाच एक ‘युनिक ब्रँड’ आहे... तो जोपासला पाहिजे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT