bitter gourd esakal
लाइफस्टाइल

कडू कारलं कसं होईल गोड! जाणून घ्या सिक्रेट टिप्स

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी या सोप्या पद्धती जाणून घ्याच

सकाऴ वृत्तसेवा

तुम्ही तुमच्या आहारात कारल्याच्या कडूपणामुळे समावेश करण्यास संकोच करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही त्याचा कडूपणा सहज दूर करू शकता.

कारले खायला कडू वाटत असले तरी आरोग्यासाठी ते वरदानापेक्षा कमी नाही. याचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या कडू चवीमुळे, लोकांना त्यांच्या आहारात समाविष्ट करणे आवडत नाही. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल आणि तुमच्या आहारात याचा समावेश करण्यास संकोच करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही कारल्याचा कडूपणा सहज दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

- कारल्याची भाजी बनवण्यापूर्वी सुरवातीला कारली वरून सोलून घ्या आणि त्यावर असलेली सर्व खडबडीत त्वचा काढून टाका. नंतर ते कापून त्यातील बिया काढा कारण कारल्याच्या बिया खूप कडू असतात. त्यानंतर त्याची भाजी करावी.

- कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ टाकून थोडावेळ राहू द्या. यानंतर कारले उकळवून नंतर ते बनवा. त्यामुळे कारल्याच्या भाजीचा कडूपणा कमी होईल.

- कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी त्याचे छोटे तुकडे करा आणि नंतर ते दह्यामध्ये तासभर भिजत ठेवा. असे केल्याने कारल्याला कडू चव येणार नाही.

- कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी पहिला त्याची साल काढावी आणि नंतर त्यावर मैदा व मीठ लावून तासभर राहू द्या. त्यानंतर धुऊन त्याची भाजी करावी.

- कारल्याची करी बनवताना कांदा, बडीशेप किंवा शेंगदाणे वापरा. यामुळे कारल्याचा कडूपणा दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT