lakshmi pujan esakal
लाइफस्टाइल

Diwali Festival 2021 लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळचे 'हे' 4 तास शुभ

तुषार महाले

दिवाळीत (diwali festival) वसूबारसेपासून नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघावयास मिळत आहे. वसुबारस, धनत्रयोदशी साजरी केल्यानंतर गुरुवारी (ता. ४) नरक चतुर्दशी (Narak chaturdashi), लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) असून बुधवार (ता.३) वगळता दिवाळी पाडवा, भाऊबीज सण पाठोपाठ येत आहेत. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा यादिवशी मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी 4 तास शुभ आहेत, (Lakshmi Pujan diwali Puja Muhurat) जाणून घ्या सविस्तर...

लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळचे 'हे' 4 तास शुभ

लक्ष्मी पूजनाला बत्तासे, लाह्यांचा नेवैद्य दाखवण्यात येतो. पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मेनरोड, रविवार कारंजा याठिकाणी गर्दी केली होती. लक्ष्मी पूजनाला बत्तासे, लाह्यांचा नेवैद्य दाखविण्यात येत असल्याने मोठी मागणी आहे. वसूबारसपासून ते भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरवात होते. व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५ : १० ते ९ या वेळेत शुभ, अमृत, चंचल असे तीनही योग येत असल्याने योग शुभ आहेत.

- लक्ष्मीपूजन मुहूर्त (योग)

सकाळी ११ : १० ते १२ : ४० (चंचल)

दुपारी १२ : ४० ते ३ : ४० (लाभ, अमृत)

सायंकाळी ५ : १० ते ९ : ०० (शुभ, अमृत, चंचल)

- दीपावली पाडवा मुहूर्त (योग)

सकाळी ६ : ४० ते ९ : ४० ( लाभ, अमृत)

दुपारी ९ : ४० ते ११ : १० (अमृत)

सायंकाळी ५ : १० ते ६ : ४० (चंचल)

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत आहे. नरक चतुर्दशीला सूर्योदयाच्या आत अभ्यंगस्थान करावे. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५ : १० ते ९ या वेळेत शुभ, अमृत, चंचल असे तीनही योग येत आहे.

- सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT