Fashion Tips height wise  esakal
लाइफस्टाइल

Fashion: हटके दिसायचं असेल तर Height Wise असावी कपड्यांची चॉईस; दिसाल प्रेझेंटेबल

योग्य कपड्यांमुळे तुमची पर्सनॅलिटी उठून दिसू शकते

सकाळ ऑनलाईन टीम

Fashion Tips: ऑफिसमध्ये असो किंवा बाहेर एखाद्या कार्यक्रमात तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमच्या कपड्यांच्या स्टाईलने अनेकांचे लक्ष तुमच्याकडे खेचल्या जाते. तुम्हाला सुट होणारे कपडे जर तुम्ही परिधान केले नसले तर बरेचदा इतरांमध्ये तुम्हाला ऑकवर्डही फिल व्हायला लागतं. अशा वेळी तुमच्या कपड्यांची चॉईस आणि तुम्हाला सुट होणारे कपड्यांचे रंग महत्वाचे ठरतात.

ऑफिसमध्ये जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना तुमचं प्रेझेंटेबल दिसणं जास्त महत्वाचं ठरतं. नाहीतर तुमचं हवं तसं इंप्रेशन पडणार नाही.

ठेंगण्या स्त्री पुरुषांनी असा करावा परिधान

तुम्ही ठेंगणे असाल तर उंच दिसण्यासाठी एक महत्वाची युक्ती करा. सैल कपडे चुकूनही घालू नका. याऊलट तुम्हाला फिट आणि स्लीम कपडे घालायला हवे त्यामुळे तुमची उंची कमी असेल तरी तुमचा बांधा उंच दिसण्यासा मदत होते. तसेच तुम्ही ठेंगणे असल्यास अट्रॅक्टिव्ह प्रिंटचे कपडे घाला. ही प्रिंट लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल.

उंच आणि सळपातळ व्यक्तींनी या गोष्टी लक्षात ठेवाव्या

तुम्ही उंच असल्या कारणाने सळपातळ दिसू शकता. त्यामुळे तुम्ही सैल कपडे घातल्यास हरकत नाही. तसेच बलुन टॉप किंवा स्लिव्ज घालत तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसू शकता. तसेच उंच सावळ्या व्यक्तींना लाईट तर उंच गोऱ्या व्यक्तींना डार्क कलर चांगले दिसतात.

सरासरी उंचीच्या मुलींनी अॅसेसरीज घालावी म्हणजे त्या उठून दिसतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो

जॅकेट हा ऑप्शन सगळ्यांसाठी

जॅकेट ब्लेजर आणि कोट घालत कोणीही आकर्षक दिसू शकतं. त्यामुळे तुम्ही ठेंगणे असाल किंवा उंच असाल हा पर्याय सर्वांसाठी उत्तम ठरू शकतो. जॅकेट परिधान करताना तुमचा कॉन्फिडंस चांगला असू द्या कारण जॅकेट सर्वांना सूट होणाऱ्या कपड्यांपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT