Ear Hole: Sakal
लाइफस्टाइल

Ear Hole: तुमच्याही कानाचे छिद्र मोठे झाले आहेत? मग 'या' सोप्या पद्धतींचा करा वापर

Ear Fashion Tips: अनेक महिलांना मोठ्या छिद्रांमुळे ट्रेंडी आणि मोठे कानातले घालता येत नाही.

Puja Bonkile

Ear Fashion Tips: अनेक महिला त्यांच्या कानाचे सौंदर्य वाढवण्यासाठी लहान वयातच त्यांचे कान टोचतात आणि ट्रेंडी कानातले घालू लागतात. पण हळूहळू मुलींचे वय वाढत असताना त्यांच्या कानाचे छिद्रेही वाढू लागतात. महिला रोज जड कानातले घालतात तेव्हा कानाची छिद्रे मोठी होऊ लागतात.

कानाची छिद्रे लहान करा

मोठ्या छिद्रांमुळे अनेक महिलांना कानातले घालता येत नाही. कारण जेव्हा जेव्हा ते कानातले घालतात तेव्हा त्यांच्या कानातले छिद्र मोठे झाल्यामुळे पडू लागतात, हे टाळण्यासाठी काही महिला शस्त्रक्रिया करतात आणि कानाचे मोठे झालेले छिद्र लहान करतात परंतु आता तुम्हाला असे करण्याची गरज नाही. जर तुम्हाला हे छिद्र शस्त्रक्रियेशिवाय लहान करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कानाचे छिद्र लहान करण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करू शकता.

इअरलोब टेप

इअरलोप टेप नावाचे उत्पादन बाजारात उपलब्ध होऊ लागले आहे. ही एक टिकलीच्या आकाराची टेप आहे, जी तुम्ही कानातले घालताना तुमच्या कानाच्या मागील बाजूस चिकटवू शकता. याचा वापर करून तुम्ही सहजपणे कानातले घालू शकता. तुम्ही हे ऑनलाइन देखील ऑर्डर देखील करू शकता.

सर्जिकल टेप

याशिवाय तुम्ही बाजारातून सर्जिकल टेप खरेदी करू शकता. हे सामान्य टेपपेक्षा थोडे वेगळे आहे, त्यात लहान छिद्रे आहेत, ज्यातून हवा जाते आणि कानाला कोणतीही समस्या उद्भवत नाही. ही टेप कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये मिळेल.

तुम्हाला या टेपचा एक छोटा तुकडा कापून तुमच्या कानाच्या छिद्राच्या मागील बाजूस लावावा लागेल.यामुळे तुम्ही कोणतेही ट्रेंडी आणि मोठे कानातले घालू शकता.

दोन्ही बाजूंना टेप लावा

जर तुम्हाला तुमचे कान मजबूत करायचे असतील तर तुम्ही ही टेप कानाच्या पुढच्या भागावर देखील वापरू शकता. जर तुम्हाला कानात मोठी छिद्रे पडू नयेत असे वाटत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कानातले काढून ठेवावे.

असे केल्याने कानाची छिद्रे मोठी होत नाहीत. एवढेच नाही तर शक्यतो जड कानातले घालणे टाळावे. जास्त जड कानातले घातल्याने कान लटकतात आणि छिद्र मोठे होतात. तुम्ही बाजारातून सपोर्टिंग कानातले देखील खरेदी करू शकता. कारण सपोर्ट असलेल्या कानातल्या कानाला काहीही इजा होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT