fashion trends summer collection to look good classy
fashion trends summer collection to look good classy Sakal
लाइफस्टाइल

ट्रेंडी समर कलेक्शन

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

उन्हाळा म्हणताच पांढरे कपडे किंवा सौम्य रंगाचे कपडे डोळ्यांसमोर येतात. या ऋतुमानानुसार नेमके कपडे निवडताना चोखंदळपणे निवड करावी लागते. उन्हाळ्यातही आपला साजेसा फॅशन ट्रेंड जपायचा असेल, तर टाय अँड डाय कपड्यांची स्टाइल ट्रेंडमध्ये आहे.

कुर्ते, टी-शर्टपासून ते साडीपर्यंत टाय-डायचे वेगवेगळे डिझाइन व रंग लक्ष वेधतात. तीव्र उन्हात डोळ्यांत शांत वाटणारी ही फॅशन ‘स्टेटमेंट २०२४’ ची मुख्य फॅशन होण्यास सज्ज झाली आहे.

कापडावर विशिष्ट प्रकारचे डिझाइन आणि रंग लावण्याची सगळ्यात जुनी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे ‘टाय अँड डाय’. याच जुन्या परंपरेला नव्या रूपात सादर करताना टाय अँड डाय केवळ कपड्यांवरच नव्हे तर फॅशन ट्रेंड म्हणूनही समोर येतोय.

फॅब्रिक रंग वापरून घरच्या घरी कपडे, उश्यांची कव्हर,ओढणी, रुमाल, टीशर्टवर ही पद्धत वापरून ते गिफ्ट देता येते. टाय ॲण्ड यमध्ये फोल्डिंग, ट्विस्टिंग, प्लिटिंग, कापडाचे नॉटिंग आणि स्टीचिंग यांचा समावेश असतो.

कापडावर विशिष्ट डिझाइन तयार करताना पूर्वी कडधान्यांचा वापर व्हायचा. आता मात्र कॉइन, मोती, वाटाणा असे साहित्य वापरून टाय अँड डाय केले जाते. यामध्ये रंगांचा वापर हवा तसा करता येतो. पारंपरिक; परंतु ट्रेंडी असे हे तंत्र आहे.

नावाप्रमाणेच बांधून, रंग देऊन, गरम पाण्यात उकळवून टाय अँड डाय केले जाते. छत्रपती संभाजीनगरच्या आर्टिस्ट कविता सप्रे सोप्या पद्धतीने घरच्या घरी कापडांवर टाय ॲण्ड डाय आणि खास डिझाइन कशी करावी याचे प्रशिक्षण देतात.

टाय अँड डायमध्ये वेगवेगळे शेड, डिझाइन करून बटवे, ओढणी, साडी, टीशर्टवर प्रिंट करता येते. अगदी तुमच्या जुन्या कपड्यांचे अपसायकलिंग करताना टाय अँड डायची युक्ती उपयुक्त ठरते.

आरामशीर, कॅज्युअल लुकसाठी डेनिम शर्ट, टीशर्टवर टाय अँड डाय पद्धत छान दिसते. टाय अँड डायद्वारे आपण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू गिफ्ट देताना किंवा होम डेकोर म्हणून वापरण्याचा आनंद वेगळाच.

वॉल डेकोर म्हणून टाय अँड डाय ट्रेंडी दिसतो. टाय अँड डाय प्रकारातील कुर्तीसुद्धा खूप सुंदर दिसतात. प्लेन कुर्त्यांवर घरीच टाय अँड डाय करून डिझायनर कुर्ती तयार करता येते. यामध्ये कॉटन, सिंथेटिक असे दोन्ही प्रकार चालतात.

तर फॅब्रिक रंग, ॲक्रेलिक आणि नैसर्गिक रंग उठून दिसतात. फक्त इतर दोन रंगांच्या तुलनेत फॅब्रिक रंग जास्त टिकतात. घरी चादरी, उशांची कव्हर, रुमाल, जुनी प्लेन साडी, ओढणी यांना टाय अँड डाय करून अपसायकलिंग केले जाते. सोशल मीडिया साइटसवर टाय अँड डायचे शेकडो व्हिडिओ बघायला मिळतात. विशेष म्हणजे अनेकांना कलेची भुरळ असून या कलेकडे व्यवसायभिमुख कला म्हणून बघितले जात आहे.

सुकी फुले, पानांचा उपयोग

सुक्या फुलांची पानेदेखील कपडे रंगवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. मुंबईतील फॅशन आर्टिस्ट मंदिरातील निर्माल्य आणतात. वाळलेल्या फुलांचा वापर करून फुलांच्या पाकळ्यांचा सुरेख वापर करून कपड्यांना वेगवेगळे डिझाइन देतात.

घरी टाय अँड डाय करण्यासाठी सुरुवातीला पांढरे कापड घेऊन त्यावर पाकळ्या शिंपडा. यासाठी झेंडू, लॅव्हेंडर, सुक्या फुलांची पानेदेखील कपडे रंगविण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पाकळ्या पसरल्यावर त्यावर थोडे पाणी शिंपडा. ते कापड बांधा. आता गरम पाण्यात १५-२० मिनिटे ठेवा. ते बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. कापड उलगडून कोरडे झाल्यावर तुमचे नैसर्गिक रंगाचे कापड तयार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT