Financial assistance sakal
लाइफस्टाइल

महिला बचत गटांना महापालिकेतर्फे अर्थसाहाय्य

महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होत असतो.

सकाळ वृत्तसेवा

महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होत असतो. त्यात महापालिकेमार्फत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. त्यात पुणे महापालिकेमार्फतही विविध योजनांतर्गत महिला बचत गटांना अर्थसाहाय्य करण्यात येते.

बचत गटांसाठी फिरता निधी

पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागाअंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या बचत गटांना प्रत्येक सभासदाप्रमाणे एक हजार रुपये इतका फिरता निधी दिला जातो. याशिवाय, जास्तीत जास्त २० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य एकदाच दिले जाते.

प्रदर्शन व विक्रीसाठी अर्थसाहाय्य

ही योजना नागरवस्ती योजनेमार्फत पुरस्कृत बचत गटातील सभासदांसाठी आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या बचतगटांना किमान एक वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक असून, बचत गटांचा व्यवहार नियमित सुरू असणे अपेक्षित आहे. दरवर्षी साधारणतः एक हजार गट विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होतात. शासनाने किंवा सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शन व विक्रीसाठी येणाऱ्या खर्चाचे ८० टक्के अनुदान किंवा किमान पाच हजार रुपयांपर्यंतचे भाडे या योजनेअंतर्गत देण्यात येते.

कागदी पिशव्या करणाऱ्यांना प्रशिक्षण

  • बचत गटातील महिलांना कागदी पिशव्या तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अनुदान

एका मुलीवर १० हजार रुपये आणि दोन मुलींवर पाच हजार रुपये प्रमाणे रक्कम युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वैकल्पिक ग्रोथ फंडात १८ वर्षांच्या मुदतीसाठी गुंतविण्यात येणार आहे. ही रक्कम १९ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही. १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आत मुलीचे लग्न केल्यास रक्कम महापालिकेकडे वर्ग करण्यात येईल.

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

SCROLL FOR NEXT