Global Handwashing Day esakal
लाइफस्टाइल

Global Handwashing Day : गंभीर आजार टाळण्यासाठी हात धुणे फायदेशीर, जाणून घ्या हात धुण्याची ‘ही’ योग्य पद्धत

जगभरात १५ ऑक्टोबर हा दिवस Global Handwashing Day म्हणून साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

हात धुणे हे किती महत्वाचे आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हात धुणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान तर वारंवार हॅंडवॉशच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात होता.

जर तुम्ही वारंवार आणि वेळोवेळी हात धुत असाल तर तुमचा अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. आपल्या हातांवर अनेक प्रकारचे जंतू लपलेले असतात. जर हात न धुताच आपण जेवण केले तर तेच जंतू आपल्या पोटाता जाण्याचा धोका असतो. त्यामुळे, वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांकडून नेहमी दिला जातो.

जगभरात १५ ऑक्टोबर हा दिवस Global Handwashing Day म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आज या दिनानिमित्त आपण हात धुण्याची योग्य पद्धत कोणती ? आणि हात कधी धुवायला हवेत ? याबद्दल जाणून घेणार आहोत.

हात धुण्याची योग्य पद्धत कोणती ?

तुमचे हात ओले करा

सर्वात आधी हात धुण्यापूर्वी तुमचे दोन्ही हात ओले करून घ्या. हात ओले करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. हे पाणी थंड किंवा गरम असले तरी चालेल. याने काही फरक पडत नाही फक्त पाणी स्वच्छ असायला हवे.

साबण किंवा हॅंडवॉशचा वापर करा.

हात ओले झाल्यानंतर दोन्ही हातांवर साबण लावा किंवा हॅंडवॉशचा वापर करा.

चांगल्या प्रकारे हात स्वच्छ करा

हातांवर हॅंडवॉश किंवा साबण लावल्यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे चोळून घ्या. बोटांजवळ, नखांजवळ लपलेली घाण स्वच्छ करा. चांगल्या प्रकारे हात स्वच्छ करा.

हात स्वच्छ धुवा

दोन्ही हात साबणाने किंवा हॅंडवॉशने साफ केल्यानंतर आता दोन्ही हात स्वच्छ पाण्याने धुवा. यासाठी नळाखाली किंवा वाहत्या पाण्याखाली हात स्वच्छ पाण्याने धुवा.

चांगल्या प्रकारे हात सुकवून घ्या

हात स्वच्छ धुतल्यानंतर आता दोन्ही हात चांगल्या प्रकारे सुकवून घ्या. यासाठी तुम्ही टॉवेलचा वापर करू शकता. टॉवेलला हात पुसून घ्या किंवा एअर ड्रायरखाली हात सुकवा.

हात कोणत्या वेळी धुणे गरजेचे आहे ?

जेवण करण्यापूर्वी

जेवण करण्यापूर्वी न चुकता हात धुणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे, जेवण करण्यापूर्वी हात अवश्य धुवा आणि मगच जेवण करा.

खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर

अनेकदा सर्दी आणि खोकल्यामुळे आपली तब्येत खराब असते. अशावेळी तर हात वारंवार धुणे आवश्यक आहे. कधीकधी अचानक खोकला किंवा शिंक येते अशावेळी त्या जंतूंना रोखण्यासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी हात धुणे गरजेचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी

अनेकदा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो. कधी फिरायला किंवा कधी कामाच्या निमित्ताने जातो, अशावेळी तिथल्या दरवाजाला किंवा इतर वस्तूंना आपण स्पर्श करतो. त्या गोष्टींवर बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर हात अवश्य धुवा.

शौचालय

शौचालयाला जाऊन आल्यानंतर हात धुणे गरजेचे आहे. कोणत्याही हानिकारक बॅक्टेरियाला रोखण्यासाठी हात अवश्य धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant Statement : नवी मुंबई विमानतळ नामकरावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे महत्वपूर्ण वक्तव्य; "धमक्या दिला तर कारवाई"

India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

Mumbai News: दादर स्थानक बनणार अधिक सुरक्षित, वेगवान ! ३४ वर्षे जुनी सिग्नल प्रणाली बदलली

Nagpur Truck Accident: विटा घेऊन जाणारा ट्रक पलटी; तीन मजुरांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT