Grandma's Batwa: Make homemade castor oil to thicken hair Esakal
लाइफस्टाइल

आजीचा बटवा: केसांना घनदाट बनविण्यासाठी घरच्या घरी तयार करा राईचे तेल

केसांना घनदाट बनविण्यासाठी बाजारामध्ये तुम्हाला अनेक उत्पादने खुणावतात. यामध्ये अगदी शँपूपासून ते कंडिशनर आणि हेअर ऑईलपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.

सकाळ डिजिटल टीम

केसांना घनदाट बनविण्यासाठी बाजारामध्ये तुम्हाला अनेक उत्पादने खुणावतात. यामध्ये अगदी शँपूपासून ते कंडिशनर आणि हेअर ऑईलपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. पण आजीचा बटवा हा सर्वात सुंदर उपाय आहे. अगदी पुरातन काळापासून चालत आलेले नुस्खे तुम्हाला कामी येतात. इतकंच नाही तर याचा वापर करणे अत्यंत सुरक्षित आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. खरं तर हे उपाय अनेक घरगुती गोष्टींवर आधारित आहेत. घनदाट केस करण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची गरज भासते

राईचे तेल घरच्या घरी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य?

500 ग्रॅम अर्थात अर्धा लिटर राईचे तेल

1 कप मेथीचे दाणे

एक मूठ कडीपत्ता

टी ट्री ऑईल

बनविण्याची पद्धत नेमकी कशी आहे?

सर्वात पहिले लोखंडाच्या कढईत तेल गरम करायला ठेवा.तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे थोडे गोल्डन दिसू लागल्यावर त्यात कडिपत्ता टाका आणि मग अत्यंत मंद आचेवर हे भाजा. हे तेल साधारण तुम्ही 15 मिनिट्स गरम होऊ द्या. मेथीचे दाणे गडद रंगाचे झाले की गॅस बंद करा. नंतर तेल थंड होऊ द्या आणि मग गाळून एखाद्या बाटलीत भरून ठेवा. बाटलीत भरल्यानंतर टी ट्री ऑईल त्यात मिक्स करा आणि मग व्यवस्थित बाटली हलवून मिक्स करून घ्या.

एक दिवस पूर्ण तसंच ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशीपासून याचा उपयोग करा. केसांवरून आंघोळ करण्याआधी एक तास तुम्ही हे तेल लावा आणि केसांना मस्त मसाज करा. आठवड्याभरात तुम्हाला याचा परिणाम दिसून येईलहे तेल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना लावा आणि मसाज करा. तुम्ही असं करू शकत नसाल तर शँपू करण्याच्या आधी किमान एक तास केसांना तेल लावा आणि मग आंघोळ करा.

आपल्या केसांच्या मुळाशी बोटाच्या सहाय्याने हलकी मालिश करा आणि तेल केसांमध्ये मुरवा हे तेल तुमच्या केसांना घनदाट करण्यास मदत करते. त्याशिवाय केसगळती थांबविण्यास आणि केसांची दुरूस्ती करण्यासही मदत करते. यामध्ये असणारे टी ट्री ऑईल केसांमध्ये येणारी खाजेची समस्या आणि कोंडा संपुष्टात आणण्याचे काम करते. कारण टी ट्री ऑईलमध्ये अँटिफंगल असते जे कोंड्यापासून सुटका मिळवून देते.

किती वेळा लावावे?

आठवड्यात तुम्हाला या तेलाचा परिणाम हवा असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावा आणि मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शँपूने लावा आणि केसांवरील तेल काढा केसांना मालिश करताना केवळ मुळाशी नाही तर अगदी केसांच्या टोकांनाही तेल लावा शँपू करताना काळजी घ्या की हा शँपू माईल्ड असावा. अर्थात सल्फेट फ्री शँपूचा वापर करा. यासाठी तुम्ही हर्बल शँपूचा वापरही करू शकता.
केसांना नुकसान पोहचत नाही. रोज केसांवरून आंघोळ करणे शक्य नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस याचा वापर करा. तुम्ही या तेलाचा उपयोग पाच दिवस अर्थात एक दिवस आडदेखील करू शकता. तुम्हाला चांगला परिणाम हवा असेल तर किमान 3-4 वेळा आठवड्यातून याचा उपयोग करायलाच हवा. यामुळे केसांना कोणतेही नुकसान पोहचत नाही आणि केस घनदाट होण्यास नक्की मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT