Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024  esakal
लाइफस्टाइल

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यासाठी सजली बाजारपेठ; तयार साड्यांनाही पसंती

सकाळ वृत्तसेवा

Gudi Padwa 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. चिव्याची काठी, साखरेच्या माळा, फळे, चाफ्यांच्या फुलांची माळ, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.

अवघ्या दोन दिवसांवर गुढीपाडवा आल्याने बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण आले आहे. पाडव्‍यानिमित्त वस्तू खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून ग्राहक चौकशीसाठी शोरूममध्ये येत आहेत. गुढीसाठी शहरातील बिंदू चौक, दसरा चौक, मिरजकर तिकटी व टिंबर मार्केट या ठिकाणी चिव्यांचे ढीग लागले आहेत. ८० ते १५० रुपयांप्रमाणे या चिव्यांची विक्री होत आहे.

अमावास्येआधी गुढीची काठी नेण्याची प्रथा असल्याने चिव्याची काठी व इतर साहित्य नेण्याकडे अनेकांचा कल आहे. शहरातील ठिकठिकाणी साखरेच्या माळांची विक्रीही होत आहे. एका माळेची किंमत २० ते ५० रुपये आहे. गुढीसाठी खास नव्या साड्याही साड्यांच्या दुकानात लक्ष वेधून घेत आहेत.

गुढीची साडी रेडिमेड

गुढी उभा करताना साडी, भरजरी ब्लाऊज पीसचा वापर करतात. गुढीला साडी नेसवताना महिलांना बराच वेळ खर्च करावा लागतो. त्यांची ही अडचण दूर करत विक्रेत्यांनी गुढीची तयार साडी बाजारात आणली आहे. गुढीला शोभणारी ही डिझायनर साडी पैठणी, भरजरी काठाची आणि सुंदर नक्षीकामात बनवली आहे. त्यामुळे यालाही महिला वर्गाची मोठी पसंती मिळते आहे.

मिनी गुढी तीनशे रुपयांपर्यंत

नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी मिनी गुढी खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून मिनी गुढीची मागणी वाढत आहे. ही गुढी साधारण दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT