gift 
लाइफस्टाइल

Guru Purnima 2023 : तुम्हीही गुरुंना भेटवस्तू देण्याचा विचार करताय? मग 'ही' ५ गिफ्ट्स नक्कीच द्या

तुम्हीही गुरुंना भेटवस्तू देण्याचा विचार करताय? मग 'ही' ५ गिफ्ट्स नक्कीच द्या

शर्वरी जोशी

आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा (guru pornima) साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुंप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. अनेक जण आपल्या गुरुंना गुलाबाचं फूल देऊन त्यांचे आभार मानतात. परंतु, बदलत्या काळानुसार गुरुंना अभिवादन करण्याची पद्धतही बदलली आहे. अनेक जण गुलाबाच्या फुलासोबतच एखादी भेटवस्तूही देतात. म्हणूनच, जर तुम्हीही गुरुंना भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर ५ बेस्ट बजेट फ्रेंडली गिफ्ट्स कोणते ते पाहुयात. (guru-purnima-2021-best-gift-ideas-for-teachers-ssj93)

१. पुस्तक -

खरं तर शिष्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी गुरु अनेकदा पुस्तकांचा वापर करत असतात. मात्र, यंदाच्या गुरु पौर्णिमेला तुम्ही शिक्षकांना एखादं पुस्तक भेट म्हणून देऊ शकता. आपल्या शिक्षकांना ज्या लेखकाचं किंवा ज्या विषयाची आवड आहे. ते पुस्तक त्यांना भेट म्हणून द्या.

२. डायरी -

अनेक जणांना दैनंदिनी किंवा डायरी लिहिण्याची सवय असते. त्यामुळे जर तुमच्या शिक्षकांनाही डायरी लिहायला आवडत असेल तर त्यांना एखादी छानशी डायरी नक्कीच भेट म्हणून द्या.

३. पुष्पगुच्छ-

एखादं गुलाबाचं फूल देण्यापेक्षा शिक्षकांना आवडत असलेल्या फुलांचा गुच्छ भेट म्हणून द्या. या पुष्पगुच्छाच्या माध्यमातून गुरुंप्रती असलेला तुमचा आदर, प्रेम, आपुलकी व्यक्त करता येते.

४. चॉकलेट्स -

चॉकलेट केवळ लहान मुलं किंवा आपल्या जोडीदारालाच दिली जातात असा अनेकांचा गैरसमज आहे. कोणत्याही नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही चॉकलेट नक्कीच देऊ शकता. शिक्षक हे मुलांसाठी आई-वडील, मित्र, गुरु अशा अनेक विविध भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे तुम्ही शिक्षकांना एखादं चॉकलेट किंवा कॅडबरी नक्कीच देऊ शकता.

५. पेन -

अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच लिखाणाचीही आवड असते. त्यामुळे जर तुमच्या शिक्षकांना लिखाणाची आवड असेल तर त्यांना एखादा छान पेन गिफ्ट करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT