Gym Tips Sakal
लाइफस्टाइल

Gym Tips : जिममध्ये सायकलिंग करताना 'या' चुका टाळा अन्यथा...

निरोगी आरोग्यासाठी अनेकांचा कल आता फिजिकल फिटनेसकडे वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gym Cycling Tips : निरोगी आरोग्यासाठी अनेकांचा कल आता फिजिकल फिटनेसकडे वाढला आहे. अनेकजण यासाठी नियमित जिममध्ये जातात. मात्र, काहीवेळा जिममध्ये वर्कआऊट करताना कळत न कळत चूक होते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आज आम्ही तुम्हाला जिममध्ये सायकलिंग करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत माहिती सांगणार आहोत.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

अनेकदा सायकलिंग करताना कंबरेचा भाग समोरच्या बाजूला झुकवला जातो. अशा पद्धतीने सायकलिंग करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे जिममध्ये सायकलिंग करताना कंबर पुढच्या बाजूला झुकली जाणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो सायकलिंग करताना कंबर सरळ ठेवा.

जिममध्ये कार्डिओ करताना अनेकजण सायकलिंग करतात. सायकलिंगमुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. मात्र, अनेकजण सायकलिंग करताना छोट्या छोट्या चूका करतात. ज्यामुळे याचा फायदा होत नाही.

सायकलिंग करताताना वाकू नका

जिममध्ये सायकलिंग करताना अनेकजण कंबरेचा भाग पुढे वाकवतात. त्यामुळे तुम्हीदेखील जिममध्ये सायकलिंग करत असाल त्यावेळी कंबर पुढच्या बाजूला झुकली जाणार नाही याची काळजी घ्या.

थोडा दबाव टाका

सायकलिंग करताना शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्याचा प्रयत्न करा. अनेकजण सायकलिंग करताना हलक्या दाबाने सायकलिंग करतात. मात्र, असे न करता थोडा जोर देऊन सायकलिंग करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होईल. अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी सायकलिंग मोड थोडा हार्ड मोडवर ठेवा. यामुळे व्यायाम करताना कॅलरी बर्न करण्यास मदत होईल तसेच वजनही कमी होईल.

पायांच्या स्थितीकडे द्या लक्ष

जिममध्ये सायकलिंग करताना पायांच्या स्थितीकडेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकजण जिममध्ये सायकलिंग करताना सीट खाली करतात. यामुळे पाय जमिनीला स्पर्श करू शकतात. त्यामुळे सायकलिंग करताना सीट आणि पायांच्या पोझिशनकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वरील छोट्या छोट्या चुका टाळून तुम्ही वर्कआउट करून चांगले फायदे मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT