लाइफस्टाइल

दिवाळीत काम करून करून हात थकलेत, अशी घ्या काळजी

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी सुरू झालीय. सोबत थंडीही आहे. पण या काळात केलेल्या साफसफाईमुळे, अती कामामुळे थकवा येतो. आपल्या हातांचे श्रम जास्त होतात. अशावेळी हातांची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. काही घरगुती उपायांनी तुम्ही हाताची काळजी घेऊ शकता. त्यामुळे हाताचा मसाज तर होईलच. शिवाय हाताचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल. त्यासाठी हे काही उपाय करा.

स्क्रबिंग करा - दिवाळीते जे उटणे वापरतो त्याचा वापर हाताच्या मसाज करण्यासाठी करता येईल. उटणं आणि दूध एकत्र करून त्यांचे स्क्रब तुम्ही हाताना लावू शकता. त्यामुळे हाताची त्वचा उजळेल. स्क्रब लावल्यानंतर हाताला मॉश्चरायझर लावा.

तेलाने मसाज- आपण जास्तीतजास्त काम हाताने करतो. त्यामुळे हाताला मसाज करून आराम देणं गरजेचं आहे. साध्या खोबरेल तेलाने रोज 15-20 मिनिटे मसाज करणं पुरेसं आहे. यामुळे हात चमकदार होतील तसेच रक्ताभिसरण क्रियाही सुरळीत होईल.

डाळीचे पीठ लावा - डाळीचे पीठ आणि दूध एकत्र करून ते मिश्रण हाताला चोळावे. थोडेसे घट्ट पीठ करावे आणि ते वापरावे. हे पीठ लावल्यामुळे तुमच्या हातावरची डेड स्कीन निघून जाईल. आणि हातही चांगले राहतील.

sweatning on hand

मध आणि लिंबाचा वापर करा - मध आणि लिंबू हे दोन्ही समप्रमाणात घ्यावे. ते एकत्र करून त्याचे मिश्रण हाताला चोळायचे. लिंबाचे सालही वापरता येईल. साल हातावर घासून हात स्वच्छ करता येईल.

टोमॅटोचा रस लावा - हाताचा रखरखीतपणा कमी करायचा असेल तर हाताला टोमॅटो लावावा. चांगला चोळल्यावर हात 15-20 मिनीटांनी स्वच्छ धुवावेत. त्यांनी तुमच्या हाताचा काळेपणा दूर होईल. शिवाय हात मऊ होण्यासही मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT