Benefits of Bhujangasana esakal
लाइफस्टाइल

Benefits of Bhujangasana : पाठीचा कणा ताठ हवा? मग, दररोज करा भूजंगासन, जाणून घ्या पद्धत अन् फायदे

Benefits of Bhujangasana : आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी योगाची मदत घेतली जाऊ शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Bhujangasana : नियमित योगा केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी योगाची मदत घेतली जाऊ शकते. योगासनांमध्ये देखील विविध प्रकारची योगासने आहेत. यापैकीच एक असलेले योगासन म्हणजे भूजंगासन होय.

भूजंगासन हे योगासन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. या योगासनाचा सराव सर्व वयोगटातील लोक करू शकतात. नियमितपणे हे योगासन केल्याने त्याचा शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पाठीच्या समस्या दूर करण्यासाठी हे एक प्रभावी योगासन आहे.

यासोबतच हे योगासन किडनी, यकृत आणि  फुफ्फुसांनाही निरोगी बनवते. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही रोज या योगासनाचा सराव करू शकतात. आज आपण हे योगासन करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि त्याचे फायदे काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

भूजंगासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • भूजंगासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर सरळ झोपा आणि पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.

  • आता तुमचे दोन्ही हात छातीजवळ नेऊन हाताचे तळवे जमिनीला समांतर ठेवा.

  • आता दीर्घ श्वास घेऊन पोट वरच्या दिशेने उचला आणि आकाशाकडे पाहा.

  • काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यावर तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • या दरम्यान सामान्यपणे श्वासोच्छवास घेत राहा.

  • त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

  • हा सराव २-३ वेळा करा.

भूजंगासन योगासन करण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

  • योगा तज्ज्ञांच्या मते हे योगासन केल्याने पाठीचे स्नायू निरोगी ठेवण्यास मदत होते.

  • आपल्या शरीराची पचनक्षमता, यकृत आणि किडनीच्या कार्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी हे योगासन फायदेशीर मानले जाते.

  • नियमितपणे हे योगासन केल्याने पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत होते.

  • हे योगासन करताना छाती, फुफ्फुसे, खांदे आणि पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे, शरीराला आराम मिळतो.

  • नियमितपणे हे योगासन केल्याने ताण-तणाव आणि थकवा दूर होतो.

  • हे योगासन दररोज केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT