Ginger Benefits 
लाइफस्टाइल

Ginger Benefits: कच्च आलं खा अन् रहा निरोगी

रोजच्या वापरात असणाऱ्या या आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या रोज आहारातले काही पदार्थ हे काही आजारांवर गुणकारी ठरत असतात. पण आपल्या काही गोष्टींची माहितीदेखील नसते. आता आल्याचचं पाहा ना. रोजच्या वापरात असणाऱ्या या आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. पुरुषांच्या आरोग्यासाठी आलं विशेष लाभदायी आहे.

बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा आणि व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव आदी कारणांमुळे आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. अनेकांना कमी वयातच ब्लड प्रेशर आणि डायबेटिस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. पण, कच्चं आलं हे यांसारख्या आजारांवर गुणकारी ठरते.

कोलेस्टेरॉलची समस्या कमी

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आल्याचं सेवन महत्त्वपूर्ण ठरतं. तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर कच्चं आलं खा. आल्याच्या सेवनानं कोलेस्ट्रेरॉलची पातळी कमी होते. तसंच हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी कच्चं आलं खाणं फायदेशीर आहे.

अन्न पचण्यास उपयुक्त

कच्च्या आल्याचे सेवन केल्याने पचनक्रियाही निरोगी ठेवता येते. वास्तविक आल्याच्या मदतीने अन्न सहज पचते. त्यामुळे अपचनाची भीती नसते. पोटदुखी, सर्दी, फुगणे, उलट्या यासारख्या समस्या आल्याचे नियमित सेवन केल्याने टाळता येते.

मधुमेहाचा धोका कमी होतो

आल्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. आले खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्याच वेळी टाइप 2 मधुमेहामध्ये आले खाणे सर्वोत्तम आहे. याशिवाय आल्याचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह ताणही येत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मासीक पाळीदरम्यान..

महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप पोटदुखी होते. अशावेळी आल्याचे सेवन करावे. महिलांना त्यांच्या दैनंदिन आहारात आल्याचा समावेश करून मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

ताण तणाव कमी

आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT