लाइफस्टाइल

Health Care News : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवळा फायदेशीर; जाणून अन्य घ्या फायदे..

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवळा फायदेशीर..

Aishwarya Musale

आवळा जवळपास प्रत्येक घरात वापरला जातो. आवळा खाण्यास चवदार तर आहेच, पण त्याचे आरोग्य फायदेही कमी नाहीत. आयुर्वेदात आवळ्याचा उल्लेख त्याच्या गुणधर्मांमुळेच आहे. आवळा खाल्ल्याने पचनाच्या समस्यांपासून ते केस गळणे, दमा अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

फार कमी लोकांना माहिती असेल की आवळा खाल्ल्यास ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळेच आवळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की आवळ्याचा मधुमेहाच्या रुग्णांना कसा फायदा होतो.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्म

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलसारखे अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. म्हणून, जेव्हा तुम्ही आवळा तुमच्या आहाराचा एक भाग बनवता, तेव्हा ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकते.

मधुमेह

आवळा मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील चांगला आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. रोज सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि शुगर नियंत्रणात राहाते.

त्वचेसाठी

आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्यासाठी आणि चेहऱ्यावरली डाग दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश केल्यामुळे तुमची त्वचा चांगली आणि निरोगी राहण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, तो शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करू शकते. आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लठ्ठपणा

आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे शरीराला अनेक फायदे देण्यासोबतच वजन नियंत्रित करण्यातही मदत करतात. रोज आवळ्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Darekar: पालिकेसाठी ठाकरेंचे मराठीचे सोंग, भाजप नेत्याची बोचरी टीका

मंचावर तेजश्री प्रधानने अचानक ऐकलं 'होणार सून मी या घरची' मालिकेचं नाव; निवेदकाला थांबवत एकच गोष्ट म्हणाली...

Pune Crime News : इकडे मुख्यमंत्र्यांनी पोलीस ठाण्याचं उद्घाटन केलं, तिकडे तिघांनी सराफा दुकानावर दरोडा टाकला...पुण्यातील धक्कादायक प्रकार

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत; 'अंधेरा' या सिरीजमध्ये साकारणार दमदार भूमिका!

Sharanu Hande Case: शरणू हांडेचं अपहरण का झालं? पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत घटनाक्रमच सांगितला!

SCROLL FOR NEXT