Health Care  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: चुकूनही रात्री मोजे घालून झोपू नका, अन्यथा होऊ शकतात हे नुकसान

अनेक जणांना रात्री झोपताना मोजे घालून झोपण्याची सवय असते. पण हीच सवय तुम्हाला देखील असेल तर आत्ताच सावध व्हा.

Aishwarya Musale

चांगल्या झोपेसाठी, मंद प्रकाश, स्लो म्यूजिक, खोलीत शांत वातावरण आवश्यक आहे. दुसरीकडे, काही लोकांचा असा विश्वास आहे की रात्री मोजे घातल्याने त्यांना रात्री चांगली झोप येते. पण असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केमिस्ट क्लिकचे फार्मासिस्ट अब्बास कनानी यांनी Express.co.uk च्या संशोधनाचा हवाला देत सांगितले की, 'थंड वातावरणात वापरल्या जाणाऱ्या सॉक्सचा झोपेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होतो, तसेच काही नकारात्मक परिणामही होतात.'

संशोधन काय सांगते

संशोधनात पुढे असे दिसून आले आहे की मोजे घालून झोपल्याने जास्त झोप लागते आणि रात्री कमी जागरण होते. रात्रभर मोजे घातल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. पण दुसरीकडे, जर एखाद्याने टाईट-फिटिंग मोजे घातले तर काही शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात.

कनानी म्हणतात, 'जोपर्यंत तुमचे डॉक्टर मोजे घालण्याचा सल्ला देत नाहीत, तोपर्यंत तुम्ही मोजे घालून झोपणे टाळावे. टाईट मोजे पायांमध्ये रक्त प्रवाह कमी करतात. जे लोक रोज मोजे घालण्याचा विचार करतात, त्यांच्या शरीराचे तापमानही वाढू शकते.

विशेषत: जेव्हा तुमचे मोजे टाईट असतात आणि जर त्यांच्यातून हवा जात नसेल. जर एखाद्या व्यक्तीचे पाय खूप गरम झाले आणि घाम येत असेल तर नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला माहित आहे का? नखांमधील फंगल इन्फेक्शन हे नखांच्या वरील भागांपासून होण्यास सुरुवात होते. तसेच त्यांनतर ते नखांमध्ये पसरते. यामुळे पिवळी पडणे, सतत तुटणे तसेच, नखाच्या आजबाजूच्या भागात सूज येणे आणि वेदना होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी तुम्ही लगेचच डॉक्टरांशी संपर्क करु शकता.

पुरुषांना स्त्रियांपेक्षा नखांचे फंगल इन्फेक्शन अधिक होण्याची शक्यता असते. मुलांपेक्षा प्रौढांमध्ये हा संसर्ग अधिक होतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जर अशा प्रकारचे संसर्ग सतत होत असतील तर तुम्हालाही ते होण्याची शक्यता असते. तसेच वृद्ध प्रौढांना हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्यात रक्ताभिसरण कमी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT