लाइफस्टाइल

Yoga for Cold Cough : सर्दी, खोकला झालाय? मग करा ही योगासनं, लगेच मिळेल आराम

Aishwarya Musale

थंडीच्या दिवसात सर्दीसोबत खोकल्याची समस्याही सामान्य होते. काही लोकांना संपूर्ण थंडीच्या काळात खोकल्याचा त्रास सहन करावा लागतो आणि उपचार करूनही त्यांना आराम मिळत नाही. खरं तर, खोकला दूर करण्यासाठी घेतलेल्या बहुतेक ऍलोपॅथी औषधांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

अशा स्थितीत कफपासून मुक्ती मिळवण्यासाठी केवळ नैसर्गिक उपायच सुरक्षित आहेत आणि नैसर्गिक उपायांचा विचार केला तर योगापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या योगासनांविषयी सांगत आहोत, ज्यांच्या नियमित सरावाने खोकल्याच्या समस्येपासून सहज सुटका मिळू शकते.

प्राणायाम

प्राणायाम हा श्वास घेण्याचा एक मार्ग आहे, ज्यामध्ये श्वासोच्छवासाचा वेग नियंत्रित केला जातो. अशा स्थितीत प्राणायाम करताना श्वासोच्छवास नियमित केल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात आणि ते मजबूत होतात. यामुळे खोकला, सर्दी, दमा यांसारख्या आजारांवर त्याचा उपयोग होतो. याशिवाय फुफ्फुसात जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठीही योगासने उपयुक्त ठरतात.

भुजंगासन

भुजंगासनाच्या नियमित सरावाने कफाच्या समस्येपासून आराम मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो की या आसनाला कोब्रा पोज देखील म्हणतात, कारण पोटातून पुढचा भाग वर करताना सापासारखा आकार तयार होतो.

त्याच्या पद्धतीबद्दल सांगायचे तर, यासाठी सर्वप्रथम हे आसन करताना प्रथम पालथे झोपून हनुवटी छातीला आणि कपाळ जमिनीला टेकवायचे. हाताचे पंजे छातीजवळ आणून हाताच्या पंजावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचलायचा. कमरेखालचा भाग हलवायचा नाही. हे 10 ते 12 सेकंद करणे गरेजेचे आहे. या आसनात श्वास घेण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केल्यास फुफ्फुसांना बळकटी मिळू शकते. थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी कमी होते. दम्याचा त्रासही कमी होतो.

धनुरासन

धनुरासनाचा सराव खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे. धनुरासनाच्या वेळी छाती, घसा आणि बरगड्यांवर दाब पडतो आणि त्यामुळे कफाच्या उपचारात मदत होते. याचा सराव करण्यासाठी सर्वात पहिले योगा मॅटवर पोटाच्या आधारे झोपा, पाय जवळ ठेवा आणि हात पायाजवळ ठेवा.

हळूवारपणे गुडघे वाकवा आणि हातांनी दोन्ही पायांच्या घोट्यांना धरा. नाकाने श्वास आत घ्या आणि शरीराला आतल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करा आणि छाती वर करा आणि मांड्या जमिनीवरून उचला. हातांनी पाय ओढा. नंतर समोरच्या बाजूला बघा आणि चेहऱ्यावर गोड स्माईल ठेवा. तुमचे लक्ष श्वासाच्या वेगावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

शरीराची स्थिती धनुष्यासारखी stretched पाहिजे. हे तेव्हापर्यंत करा की जेव्हा तुम्ही हे आसन सहजपणे करु शकाल. दीर्घ आणि मोठा श्वास घ्या. जवळपास 15-20 सेकंदानंतर श्वास सोडा आणि पुन्हा तुमच्या सामान्य स्थितीमध्ये या.

याशिवाय बम भस्त्रिका, सुखासन, पद्मासन आणि वज्रासनाचा सराव खोकला आणि सर्दीचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. परंतु या आसनांचा सराव करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही त्यांचा सराव तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला ते सहज करता येतील आणि त्यामुळे शरीरावर कोणताही अतिरिक्त दबाव पडत नाही. कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अस्वस्थता टाळण्यासाठी, तुम्ही योग तज्ञाच्या देखरेखीखालीच या योगांचा सराव सुरू करणे चांगले होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT