Jaggery  
लाइफस्टाइल

गुळाच्या अतिसेवनामुळे निर्माण होतात 'या' शारीरिक समस्या

गुळाचा अतिवापर करत असाल तर वेळीच व्हा सावध

सकाळ डिजिटल टीम

गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे नियमितपणे गुळाचं सेवन करावं असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. वजन कमी करण्यासाठीदेखील अनेक जण साखरेऐवजी गुळाचा पर्याय निवडतात. मात्र, आहारवेद असलेल्या गुळाचा Jaggery अतिवापर केल्यामुळे काही शारीरिक समस्याही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच, गुळाचं अतिसेवन केल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ते पाहुयात. (health jaggery side effects for health)

१. वजन वाढणे -

वजन कमी करण्यासाठी गुळ खासकरुन खाल्ला जातो. मात्र, या गुळाचं अतिसेवन केल्यावर त्याचे साइड इफेक्ट्स दिसू शकतात. वजन कमी करणारा हा गुळ जास्त खाल्ल्यावर वजन वाढूही शकतं. गुळात कार्ब्स आणि शर्करा असते. ज्यामुळे वजन वाढू शकतं.

२. नाकातून रक्त येणे -

हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुंमध्ये गुळाचा वापर प्रमाणात करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, या दोन्ही ऋतुंमध्ये गुळाचं अतिप्रमाणात सेवन केलं तर नाकातून रक्त येण्याची शक्यता असते. तसंच नाकातील नस तुटण्याचीही शक्यता असते.

३. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे -

गुळाचं जास्त सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. गुळामध्ये सुक्रोजचं Sucrose प्रमाण जास्त असतं त्यामुळे रक्तातील शर्करा वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचं सेवन प्रमाणात करावं.

४. पचनाशी निगडीत समस्या -

गुळामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्थेशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात. यात पोटदुखी, छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे असा त्रास होऊ शकतो.

५. सूज येणे -

गुळामध्ये शर्करेचं प्रमाण जास्त असल्यामुळे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीरावरील काही भागांवर सूज येऊ शकते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT