mask e sakal
लाइफस्टाइल

तुम्ही कोणता मास्क वापरता? निवड करतांना 'ही' काळजी घेताय ना?

मास्क खरेदी करतांना घ्या 'ही' काळजी

शर्वरी जोशी

सध्या देशावर कोरोनाचं (covid-19) संकट आहे. त्यामुळे या काळात स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून वारंवार तीन सूत्रांचं कटाक्षाने पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क(mask) घालणे व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सुचना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या काळात मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातच सध्या बाजारात विविध प्रकारचे, रंगांचे मास्क उपलब्ध आहेत. परंतु, मास्क खरेदी करतांना विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा मास्क आवडला म्हणून घेतला असं अजिबात करु नका. आपली एक चूक आपल्यालाच महागात पडू शकते. त्यामुळेच मास्क खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी ते पाहुयात. (health know which type of mask protect you from covid-19)

अनेक जण एकच मास्क (mask) बराच काळ वापरतात. वारंवार एकच मास्क वापरल्यामुळे एकतर तो लूज होतो. परिणामी, तो सतत चेहऱ्यावरुन घालती असतो. हे अत्यंत धोकादायक आहे. तसंच काही जण अत्यंत फिट म्हणजेच घट्ट मास्क घेतात. त्यामुळे कानामागे व गालावर पट्ट्यांचे वळ उठतात. त्यामुळे मास्कची निवड करतांना काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच आज आपण मास्कचे प्रकार, ते घेण्यामागील कारण आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत.

१. सर्जिकल मास्क -

सर्जिकल मास्क या नावातच सारं काही आहे. या मास्कमध्ये तीन लेअर असतात. त्यामुळे हवेतील धुलीकणदेखील नाकावाटे शरीरात प्रवेश करु शकत नाहीत. हा मास्क युज अॅण्ड थ्रो स्वरुपातही उपलब्ध आहे.

२. सुती कापडाचा मास्क -

अनेकांना मास्क लावला की श्वास घ्यायला त्रास होतो. अशा व्यक्तींनी सुती कापडापासून तयार केलेले मास्क वापरावेत. यामुळे श्वासोच्छवास घ्यायला त्रास होत नाही. विशेष म्हणजे या मास्कची विशेष लोकप्रियता आहे. वापरायला सहजसोपा असल्यामुळे अनेक जण तो खरेदी करतात. हा मास्क धुवून पुन्हा वापरता येतो.

३. N95 मास्क -

सगळ्यात खात्रीशीर मास्क म्हणून याकडे पाहिलं जातं. या मास्कवर एक छाकणासारखं वॉल्व असतो. परंतु, ज्या मास्कवर वॉल्व नाही असाच मास्क वापरावा.

४. रुमाल किंवा स्कार्फ -

अनेक जण गर्दीच्या ठिकाणी मास्क पडू नये किंवा चेहऱ्यावरुन सरकू नये यासाठी रुमाल किंवा स्कार्फ बांधतात. परंतु, रुमाल बांधतांना तो डबल करुन बांधावा.

मास्क घालतांना घ्या 'ही' काळजी

१. नाक, तोंड व हनुवटी कव्हर होईल असा मास्क वापरावा.

२. चेहऱ्यावर नीट बसेल असाचा मास्क घ्यावा.

३. जास्त घट्ट व जास्त सैलदेखील नसावा.

४. मास घातल्यावर वारंवार त्याला हात लावू नका.

५. मास्क काढल्यावर हात स्वच्छ धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT