लाइफस्टाइल

जांभई आल्यावर डोळ्यातून का येतं पाणी? जाणून घ्या कारण

कंटाळा आला की जांभई येते असा सर्वसामान्य समज आहे. मात्र...

शर्वरी जोशी

कामाचा ताण वाढला की त्याचा परिणाम सहाजिकच आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असतो.त्यामुळे अनेकदा काम करताना कंटाळा येणे, आळस येणे वा वारंवार जांभई येणे असे प्रकार घडतात. विशेष म्हणजे केवळ कंटाळा आला की जांभई येते असा एक सर्वसामान्य समज आहे. मात्र, जांभई येण्यामागे अनेक कारणं आहेत. तसंच जांभई दिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं. पण हे पाणी नेमकं का येतं ?याचा कधी विचार केला आहे का? (health-why-your-eyes-become-teary-when-you-yawn)

जांभई का येते?

जांभई येण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे थकवा, अपूर्ण झोप किंवा शरीरात ऑक्सिजनची कमतरता. या दोन कारणांमुळे अनेकदा जांभई येते. परंतु, या कारणांव्यतिरिक्त औषधांचा परिणाम, शरीराच्या तापमानात बदल होणे, मेंदूच्या कार्यात बिघाड. ही कारणही आहेत.

जांभई आल्यावर डोळ्यात पाणी का येतं?

जांभई आल्यानंतर आपले डोळे किंचितसे बारीक होतात. तसंच तोंड उघडल्यामुळे चेहऱ्यावरील इतर भागांवरही ताण पडतो. यात आपल्या दोन्ही भुवयांमधील भागदेखील ताणला जातो. या भागामध्ये डोळ्यातून पाणी आणण्याचं कार्य करणाऱ्या ग्रंथी असतात. जांभई देताना या ग्रंथींवर परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्यातून पाणी येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT