Healthy Diet  esakal
लाइफस्टाइल

Healthy Diet : रोजच्या चपातीला बनवा हेल्दी, फक्त गव्हाच्या पिठात टाका हा एक पदार्थ, वजन होईल कमी

काही लोकांना चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही

सकाळ डिजिटल टीम

Healthy Diet :  वजन कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडात एक वाक्य असते. ते म्हणजे मी चपाती, भाकरी बंद केली म्हणून वेट लॉस झालंय. किंवा मी भात बंद केला म्हणून मी बारीक होऊ शकते. तर याच कारण असं की या सगळ्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेड जास्त प्रमाणात असतात. वजन वाढण्यासाठी या गोष्टी कारणीभूत असतात त्यामुळे लोक चपाती, भाकरी खायला नकार देत आहेत.

ग्लूटेन फ्री डायट

सध्या एक फॅड आहे ते म्हणजे ग्लुटेन फ्री डायट केल्याने शरीरावरील चरबी कमी होते. त्यामुळे डायटमध्ये चपाती भाकरी ऐवजी उकडलेल्या भाज्या, कडधान्य खाण्यावर जोर दिला जातो. चपातीमध्ये असलेले ग्लूटेन हट्टी चरबी वाढवतं त्यामुळे अनेक लोकांची चपाती खाणं बंद झालं आहे. (Weight Loss Tips In Marathi)

पण तुम्ही चपाती शौकीन असाल किंवा चपाती खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही असे तुम्हालाही वाटत असेल. तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगणार आहोत जी तुम्ही वापरली तर चपाती खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही. कसं ते पाहू

गव्हाच्या पिठात टाका हा पदार्थ

चपातीसाठी कणिक मळत असताना त्यामध्ये जर तुम्ही पिठात बेसन टाकले तर तुमची चपाती अधिकच पौष्टिक होणार आहे. बेसन हे हरभऱ्याच्या डाळीपासून बनतं. हरभऱ्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे गव्हाच्या पिठात जर तुम्ही बेसन मिसळले तर तुम्हाला वजन कमी होण्यास मदत होणार आहे. (Wheat)

किती प्रमाणात घ्यावे

तुम्ही एक कप किंवा एक वाटी गव्हाचे पिठ घेत असाल तर त्यात अर्धी वाटी बेसन घालावे. यामुळे पीठातील प्रोटीनचे प्रमाण वाढेल अशी आरोग्यदायी चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. (Diet Tips)

चपाती बनवताना हे लक्षात ठेवा

कणिक मळत असताना बेसन आणि गव्हाचे पीठ योग्य प्रमाणात घ्या. यात आवश्यकतेनुसार मीठ घाला. कणिक मळल्यानंतर लगेचच या चपाती करायला घ्या. कारण हे पीठ मळून ठेऊ नका. तसेच याची चपाती करत असताना जाडसर लाटावी. ज्यामुळे ती गुबगुबीत होते अन् चवीलाही छान लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT