Home-Cleaning
Home-Cleaning 
लाइफस्टाइल

दिवाळीची साफसफाई करताय? तर, या गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीचा सण जवळ आला की, अनेकांकडे साफसफाईला सुरूवात होते. घर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी ही साफसफाई अत्यंत गरजेची असते. एकीकडे फराळाची लगबग, एकीकडे साफसफाई या दोन्ही बाजू हाताळताना महिलांची धावपळ होते. अशावेळी घरातल्या सर्वांनी जर योग्य नियोजन केलं तर हीच साफसफाई पटकन होऊ शकते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

1) घरातल्या सर्वांना कामे वाटून द्या.

2) आपल्या घरात किती खोल्या आहेत, त्यातील वस्तू, खोलीचा आकार बघून कोणती खोली कधी साफ करायची हे ठरवा.

3) आपण आवड म्हणून कितीतरी गोष्टी साठवून ठेवतो. त्यामुळे पसारा अधिक वाढतो. साफसफाई करताना या नको असलेल्या गोष्टींची विल्हेवाट कशी लावायची हे प्रामुख्याने बघा. अतिरिक्त वस्तू कोणालातरी देऊन टाका.

4) आधी आरसा, काचेच्या वस्तू , टिव्हीवर जर धूळ असेल तर ती काढून घ्या आणि मग त्या झाकून ठेवा. त्यामुळे त्या वस्तू साफ राहतील,

5) सफाई सुरू करण्याआधी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश,कापड, साबण, व्हॅक्युम क्लिनरची आधीच तयारी करुन ठेवा. त्यामुळे आयत्यावेळी एखादी गोष्ट कमी असेल तर धांदल उडणार नाही.

6) सफाईला सुरूवात करताना आधी वरचे कोपरे साफ करण्यास प्राधान्य द्यावे. तेथील धूळ, जळमटे साफ झाल्यावर कोपरा न कोपरा लखलखेल. पंख्यावरची धूळ साफ करणे देखील महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही उशांचे जुने अभ्रे वापरू शकता.

7) स्वयंपाक घराची साफसफाई महिलांवर सोडा, तिकडे त्यांचा वावर जास्त असल्याने काय हवं काय नको हे त्यांना बरोबर कळत. त्यामुळे अतिरिक्त प्लास्टिकचे डबे, चमचे, ग्लास काढून टाकायचे असतील, काही कमी गरजेचं सामान माळ्यावर ठेवायचे असेल तर ते नियोजन त्यांना नीट करता येऊन त्या वस्तू कमी जास्त करू शकतील.

8) बाथरूमची सफाई करताना टाईल्स पटकन साफ होतात. पण भिंतीवरचे डाग काढणे कठीण जास्त अशल्यास सोड्याचा वापर करा.

9) तांबा पितळीची.चांदीची भांडी या काळात जास्त वापरली जातात. त्यामुळे त्यांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा, शिकेकाईचा. डाळीच्या पिठाचा गरजेनुसार वापर करता येईल.

10) पडदे साफ करताना पडदे काही तास साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे मळ लवकर निधण्यास मदत होईल. मात्र एकावेळी एकाच खोलीतले पडदे स्वच्छ करा.

11) सतत पाण्यात हात असल्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हॅडग्लोव्हज घालायला विसरू नका.

12) सर्वात महत्वाचे म्हणजे साफसफाई करताना पाण्याचा वापर जपून करा. खाली पडलेले पाणी लगेच पुसा. नाहीतर पडून अपघात घडण्याची शक्यता निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT