लाइफस्टाइल

Dating Trend 2022: डेटिंग ट्रेंड बदलतोय?जाणून घ्या काय आहे कारण?

भक्ती सोमण-गोखले

कोरोना काळात इतर अनेक गोष्टींप्रमाणे डेट करण्याची पद्धतही बदलली आहे. पूर्वी कपल्स भेटू शकत असत. आणि त्यांच्या सोयीप्रमाणे एकमेकांना भेटून जाणून घेत असत. पण २०२० मध्ये हा संवाद ऑनलाईनवर होऊ लागला. आता पुन्हा जुन्या पद्धतीप्रमाणे लोक डेट करण्यासाठी उस्त्सुक आहेत, असे वाटते. पण भविष्यात डेटींगमध्ये अनेक नवीन आणि स्वागतार्ह बदल होणार आहेत. बंबल Bumble या डेटिंग अॅपने २०२२ साली डेटींगचा ट्रेंड कसा असेल ते सांगितले आहे.

रिसेटर्स - डेट करणाऱ्यांनी कोरोना काळात आपले मार्ग बदलले. अनेकांनी व्हिडिओ चॅट करून व्हर्च्युअल डेटींग करण्याला पसंती दिली, पण आता अॅपवरील ७१ टक्के लोक नव्या वर्षात डेटींग प्रवासात रिसेट बटण दाबण्यासाठी तयार आहेत. तर साथीच्या रोगाने ७५ लोकांना भावनिकदृष्ट्या उपलब्ध असलेला जोडीदार शोधण्यास प्राधान्य दिले आहे. पण, अर्ध्याहून अधिक लोकांच्या (५२ टक्के) जोडीदार कसा असावा या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला आहे.
एक्सप्लोरी डेटींग- साथीच्या रोगामुळे जवळपास निम्म्या लोकांना (४८ टक्के) ते कोणत्या टाईपचे आहेत, असा प्रश्न पडला आहे. २०२२ कडे पाहताना अॅपवरील निम्म्याहून अधिक डेटर्स त्यांचा दृष्टीकोन (५५ टक्के) संशोधन सुरू असल्याचे वर्णन करतील.
छंदासाठी एकत्र वेळ घालवणे- एकत्र स्वयंपाक करण्यापासून ते पॉटरी क्लास (मातीची भांडी बनविणे) तसेच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत ७५ टक्के भारतीय डेटर्सनी नवे छंद आणि कौशल्ये निवडली आहेत. हा त्यांच्या डेटींगचा एक भाग बनला आहे. अॅपवरील ५२ टक्के लोक त्यांच्या छंदानुसार डेट करण्याची योजना आखत आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी करणे मनापासून आवडते, ते काहीतरी करून लॉकडाउननंतर डेटिंगमध्ये परत जाण्याचा हा एक सोपा मार्ग लोकं निवडत आहेत.
जाणीवपूर्वक अविवाहित- आपण जाणीवपूर्वक अविवाहित राहणाऱ्या लोकांबद्दल ऐकले आहे. पण २०२२ हे वर्ष कोणीही नव्हे तर, कोणीतरी शोधण्यासाठी आहे. . साथीच्या रोगाने आपल्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांना (62 टक्के) एकटे राहणे ठीक आहे याची जाणीव करून दिली आहे. पुढचा विचार करता, लोकं जाणीवपूर्वक एकटे राहण्याचा निर्णय घेत आहेत. बहुसंख्य लोकं (५४ टक्के) ते कसे आणि केव्हा डेट करतात याबद्दल जागरूक आहेत.
पॉवर पीडीए- लसीकरणाचा दर वाढत असताना, PDA परत आला आहे. फक्त सेलिब्रिटीच नाहीत. अॅपवरील जवळजवळ ७३ टक्के अविवाहित भारतीय, कोरोनानंतर प्रेम, आपुलकीचे सार्वजनिक प्रदर्शन करण्याचा अधिक मोकळेपणाने विचार करत आहेत.
रोमान्ससाठी महत्वाचे वर्ष- बंबलच्या इंडिया कम्युनिकेशन डायरेक्टर, समर्पिता समद्दार, यांनी डेटाबद्दल सांगितले की, “गेल्या दोन वर्षांनी आम्हाला काही शिकवले असेल, तर ते म्हणजे लोक जोडीदारामध्ये नेमके काय अपेक्षित आहे, याकडे अधिक लक्ष देत आहेत. तसेच ते त्यांच्या स्वतःच्या वेळी डेटिंग करण्याबद्दल अधिक आग्रही आहेत. नवीन वर्षात प्रवेश करत असताना, भारताने निर्बंध उठवल्यामुळे, आभासी आणि IRL दोन्ही डेटिंगमध्ये लोकांना उत्साह आहे. 70 टक्क्यांहून अधिक अविवाहित भारतीय त्यांचे डेटिंग जीवन ‘रीसेट’ करू पाहतात, 2022 हे रोमान्ससाठी महत्वाचे वर्ष ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT