Cleaning Tips Sakal
लाइफस्टाइल

Cleaning Tips: घरातील दारावर पडलेले रंगाचे डाग झटक्यात होतील दूर, फक्त करा 'हे' काम

Cleaning Tips: घर रंगवल्यानंतर दारावर रंगाचे डाग राहतात. हे डाग कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Cleaning Tips: घर नवे दिसण्यासाठी अनेक लोक रंग लावतात. पण घर रंगवल्यानंतर घराच्या दारावर रंगाचे काही डाग राहतात. हे डाग कमी करण्यासाठी तुम्ही सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता. दारावरील रंगाचे डाग कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती गोष्टींचा वापर करू शकता हे जाणून घेऊया.  

बेकिंग सोडा सह स्वच्छ करा

बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही घरातील दरवाज्यावर पडलेले रंगाचे डाग स्वच्छ करू शकता. यासाठी  बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण तयार करावे. यानंतर कापडाने स्वच्छ पुसावे. दरवाज्यावरचे डाग स्वच्छ होतील.

पाणी आणि साबण

पाणी आणि साबणाच्या मिश्रण तयार करून दरवाजा स्वच्छ करू शकता. या मिश्रणामुळे दरवाजावर असलेले रंगाचे डाग स्वच्छ होतील. तसेच दरवाजा नव्यासारखा चमकू लागेल. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.

टर्पेन्टाइन ऑइल

जर तुमच्या घरात टर्पेन्टाइन तेल असेल तर त्याचा वापर करून दरवाजावर असलेले रंगाचे डाग काढून टाकू शकता. रंगाचे डाग दूर करण्यासाठी हे ऑइल खूप फायदेशीर ठरू शकते. या ऑइलच्या मदतीने तुम्ही रंगाचे डाग सहज काढू शकता. डाग कितीही जुना असला तरी कपड्याला ऑइल लावून पूर्ण दरवाजा स्वच्छ करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT