How to make children love to write school education
How to make children love to write school education  sakal
लाइफस्टाइल

मुले लिहीतच नाहीत?

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

कोविडच्या काळात ऑनलाइन शिक्षणाची सवय झाल्यानंतर हा प्रश्न पालकांना आणि शिक्षकांना वारंवार पडू लागलाय.

नुकतीच ३ मुले - एक शिशू शाळेतील, दुसरा दुसरीतील आणि तिसरा आठवीतला - आणि त्यांचे त्रस्त आई-वडील भेटले. योगायोगाने तिन्ही मुलांच्या पालकांची समस्या एकच होती - ‘मुले लिहीतच नाहीत! लिहायचा प्रचंड कंटाळा आहे, दोन ओळी लिहिल्या, की हात दुखतो. शाळेत तोंडी उत्तरे देतो; पण लिहीतच नाही. लिहायला सांगितले, की चक्क आरडाओरडा सुरू होतो!’

विशेषत: कोविडच्या काळात ऑनलाइन शिक्षणाची सवय झाल्यानंतर हा प्रश्न पालकांना आणि शिक्षकांना वारंवार पडू लागलाय.

मुले का लिहीत नाहीत?

लहान वयात लिहायचा अतिरेकी आग्रह : बालविकासाचे टप्पे लक्षात घेतले, तर मुले त्रिकोण ५ वर्षांच्या सुमारास चांगला काढू शकतात. इंग्रजी अक्षर A हा त्रिकोण आहे. मग नर्सरी, छोट्या गटापासून लिहिण्याचा हट्ट त्रास देणारच.

बोटांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास कमी पडणे : हातात पेन-पोन्सिल देण्याआधी मुलांच्या बोटांना व्यायाम देणारे खेळ कमी पडणे! विशेषत: गेल्या काही वर्षांत मुले मोबाईल/लॅपटॉप वापरायला शिकली; पण ओरिगामी, मातीत खेळणे विसरून गेली.

दृष्टी आणि बोटांतील समन्वयाचा अभाव : एकतर लहान वयातील दृष्टिदोष किंवा चंचलता/ एकाग्रतेच्या अभावामुळे डोळ्यांचे लिहिण्यावर नियंत्रण राहत नाही.

विचारशक्ती/ शब्दसंपत्ती कमी पडणे : काय लिहायचे हे कळले नाही किंवा पुरेसे शब्दच मेंदूत साठवलेले नसतील, तर लिहिण्याचा आळस होणारच.

एकसुरी, कंटाळवाणे गृहपाठ : एकच अक्षर, स्पेलिंग पानभर परत परत लिहिणे, भारंभार लिखाण्याच्या वर्कशीट्स, हे सगळे मुलांना, विशेषतः मोठ्या मुलंना नकोसे वाटते.

आत्मविश्वासाचा अभाव : लेखन सुवाच्च नसेल, किंवा कमी गुण मिळत असतील, तर मुलांचा आत्मविश्वास ढासळतो. मग लिखाणच टाळण्याची वृत्ती वाढते.

लेखनपूर्व कौशल्यांचा विकास : कणकेच्या गोळ्याशी खेळणे, भाज्या निवडणे, मणी ओवणे, बोटांनी रंगवणे, लेगो खेळणे, किल्ला बनवणे इ. अनेक छोटे मोठे खेळ मुलांचा बोटांचे सूक्ष्म स्नायू विकसित करतात. अर्थातच लिहिणे सोपे जाते.

आकर्षक, मेंदूला चालना देणारे गृहपाठ : मुलांना चित्र नावे द्यायला सांगणे, गाळलेल्या जागा भरणे, शब्दांची साखळी बनवणे यांसारखे उत्सुकता वाढवणारे, त्यांचे आकलन समजून घेणारे; पण जाताजाता लिखाणाचा सराव देणारे गृहपाठ उपयुक्त

शब्दखेळ : विशेषत: हसतखेळत, बोलताबोलता शब्दसंग्रह वाढवला, वाक्यरचनेचे नियम शिकवले, तर लिहिताना सहज सुचेल.

थोडे थोडे, जातायेता लेखन : समजा गृहपाठात ४ प्रश्न आहेत, तर एकावेळेस एकाच प्रश्नाचे उत्तर लिहायचे, मग छोटी मज्जा, मग परत दुसरा प्रश्न असे करत लिहायला सांगितले, तर - विशेषतः चंचल, लहान मुलांना- लिखाणाचा ताण जाणवणार नाही.

सहज, पटकन कौतुक : आपण मुलांना पटकन ओरडतो; पण ‘कौतुक’ करताना कंजूषपणा करतो. मुलाने चारपैकी तीन प्रश्नांची उत्तरे लिहिली, तर ‘चौथा का नाही लिहिला?’ म्हणून झापतो, त्यापेक्षा ‘तीन प्रश्नांची रे लिहिली, वा!’ हे कौतुक महत्त्वाचे! विशेषत किशोरावस्थेतील मुलांना हे कौतुक हवे असते!

शेवटचे एक भारी तंत्र :मुलांच्या समोर आपण मोठ्यांनी लिहिते होणे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT