Hair Growth Spray esakal
लाइफस्टाइल

Hair Growth Spray : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे ‘हा’ हेअर ग्रोथ स्प्रे, घरी बनवण्याची पद्धत घ्या जाणून

केस तुटणे, केस गळणे अशा अनेक प्रकारच्या केसांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : सध्या केसगळतीमुळे अनेक महिला त्रस्त आहेत. केस तुटणे, केस गळणे आणि केस अकाली पांढरे होणे इत्यादी अनेक केसांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी आपण सर्वजण विविध प्रकारचे प्रयत्न करत असतो.

आयुर्वेदिक, घरगुती आणि मार्केटमधील केमिकल प्रॉडक्ट्स इत्यादी अनेक उपायांचा वापर करून आपण केसांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत तुम्ही केसांच्य वाढीसाठी आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी हेअर मास्क, हेअर पॅक इत्यादी अनेक प्रकारचे उपाय केले ही असतील.

मात्र, आज आम्ही तुम्हाला एका हेअर स्प्रेबद्दल सांगणार आहोत. हा हेअर स्प्रे तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल, यात काही शंका नाही.

या हेअर स्प्रेमध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर करण्यात आलेला नाही. हा पूर्णपणे नैसर्गिक घटकांनी बनवलेला हेअर स्प्रे आहे. चला तर मग जाणून घेऊयात हा हेअर स्प्रे करण्याची योग्य पद्धत आणि या हेअर स्प्रेसाठी लागणारे साहित्य कोणते?

हेअर स्प्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • १ कप पाणी

  • गाजराच्या बियांचे तेल – १ चमचा

  • आर्गन ऑईल – १ चमचा

  • पेपरमिंट इसेंन्शिअल ऑईल

  • रोझमेरी इसेंन्शिअल ऑईल

  • लवेंडर इसेंन्शिअल ऑईल

  • विच हेजल – ४ चमचे

  • स्प्रे बॉटल

हेअर स्प्रे बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • हेअर स्प्रेच्या बॉटलमध्ये विच हेजल टाका त्यानंतर, वरच्या बाजूस १ इंच पाणी भरा.

  • आता, आर्गन तेल आणि गाजराच्या बियांचे तेल बाटलीमध्ये काळजीपूर्वक घाला आणि हलक्या हाताने बॉटल हलवा.

  • केसांच्या वाढीसाठी या स्प्रेमध्ये सर्व आवश्य तेल, पेपरमिंट, रोझमेरी आणि लवेंडर इसेंन्शिअल ऑईल तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला.

  • बॉटल स्प्रेचे झाकण लावून घ्या. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळण्यासाठी बॉटल चांगली हलवून घ्या. त्यानंतर, याचा केसांवर वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT