राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) अंतर्गत PRAN कार्ड लाँच करण्यात आले होते. NPS ही केंद्र सरकारने विकसित केलेली मार्केट बेस्ड पेन्शन योजना आहे जी भारतीय नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचविण्यास मदत करते.
PRAN कार्ड म्हणजे काय?
वास्तविक, परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबरवर (PRAN) 12 डिजिटल नंबर असतात, जे तुमच्या NPS खात्याशी जोडलेले आहे. तुमच्या NPS अकाउंट डिटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी PRAN कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
एनपीएसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशातील सर्व राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्राण कार्ड अनिवार्य आहे. PRAN कार्ड बनवण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) वर जाऊन संबंधित सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) NPS ट्रस्ट बँकेद्वारे चालवले जाते. हे असे ठिकाण आहे जेथे NPS सदस्य NPS अकाउंट उघडू शकतात, गुंतवणूक करू शकतात आणि पैशांचे व्यवहार करू शकतात.
PRAN अंतर्गत दोन प्रकारचे NPS अकाउंट आहेत:
प्रथम, जे अकाउंट non-withdrawable आहे आणि ते सेवानिवृत्तीच्या बचतीसाठी आहे.
दुसरे, सेविंग अकाउंटसारखे आहे. हे तुम्हाला तुमची सेटिंग्ज withdraw करण्याची परवानगी देते. परंतु यातून कोणताही कर लाभ मिळत नाही.
PRAN कार्ड काढण्यासाठी पात्रता:
१८ ते ६५ वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक NPS साठी पात्र आहे.
सरकारी, गैर-सरकारी संस्था (NGO), खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, व्यापारी आणि गृहिणी हे सर्व NPS साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
ऑफलाइन PRAN कार्ड काढण्याची प्रक्रिया:
तुमचा जवळचा पॉइंट ऑफ प्रेजेंस (POP) शोधा. जेथे, तुम्ही NPS ट्रस्ट बँकेच्या वेबसाइटद्वारे किंवा तुमच्या क्षेत्रातील केंद्रीय रेकॉर्ड-कीपिंग एजन्सी CRA/POP च्या मोबाइल अॅपद्वारे देखील POP शोधू शकता.
तुमची कागदपत्रे गोळा करा
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स)
पत्त्यासाठी ही प्रमाणपत्रे (वीज बिल, पाणी बिल, घर कर प्रमाणपत्र आणि पासपोर्ट)
बँक अकाउंट डिटेल्स (बँक स्टेटमेंट आणि चेकबुक)
शेवटी पासपोर्ट साइज फोटो.
POP केंद्रावर तुम्हाला NPS अकाउंट उघडण्यासाठी फॉर्म मिळतील.
फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.
POP प्रिंट करण्यासाठी तुम्हाला PRAN कार्ड देईल.
तुम्ही हे कार्ड डाउनलोड आणि प्रिंट देखील करू शकता.
NPS अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील.
PRAN कार्ड प्राप्त केल्यानंतर, तुम्ही NPS वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे तुमचे NPS अकाउंट ऑनलाइन मॅनेज करू शकता.
तुम्ही NPS खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.