Spectacle Marks sakal
लाइफस्टाइल

Spectacle Marks: रोज चष्मा वापरल्याने नाकावर काळे डाग पडले आहेत? 'हे' घरगुती उपाय करतील मदत

चष्म्याच्या बाबतीत एक समान्य गोष्ट म्हणजे सतत चष्मा लावल्यामुळे डोळ्यांजवळ काळे डाग पडतात.

Aishwarya Musale

सतत चष्मा घालणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर कधी कधी चष्म्याचे डाग दिसते. जे बघायला खूप वाईट वाटतात. अशा परिस्थितीत, तुम्ही काही घरगुती पद्धतींच्या मदतीने, घरच्या घरी हे डाग दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या गोष्टींबद्दल.

एलोवेरा जेल : चेहऱ्यावरील चष्म्याचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलची मदत घेऊ शकता. यासाठी एलोवेरा जेल एका कॉटन बॉलमध्ये घ्या आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भागावर लावा. नंतर काही वेळ हलक्या हातांनी मसाज करा आणि सकाळी धुवा.

टोमॅटोचा रस: कच्च्या टोमॅटोचा रस चष्म्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील वापरता येतो. यासाठी एका टोमॅटोचा रस काढून गाळून घ्या. नंतर हा रस प्रभावित भागावर लावा आणि अर्धा तास सोडा. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

टोमॅटोचा रस: कच्च्या टोमॅटोचा रस चष्म्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील वापरता येतो. यासाठी एका टोमॅटोचा रस काढून गाळून घ्या. नंतर हा रस प्रभावित भागावर लावा आणि अर्धा तास सोडा. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

संत्र्याची साल : चष्म्याचे डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी संत्र्याची साल घेऊन बारीक वाटून घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये गुलाबजलाचे काही थेंब मिसळा आणि प्रभावित भागावर लावा. त्यानंतर हलक्या हातांनी दोन ते तीन मिनिटे मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा.

गुलाबजल : चष्म्यावरील डाग दूर करण्यासाठी गुलाबजलाचीही मदत घेतली जाऊ शकते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कॉटन बॉल गुलाब पाण्यात बुडवून अर्धा तास प्रभावित भागावर ठेवा. यामुळे काही दिवसातच डाग निघून जातील.

काकडीचा रस: चष्म्याचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा रस देखील वापरू शकता. यासाठी काकडी किसून त्याचा रस काढा. नंतर हा रस बोटाने त्या डागावर लावा आणि रात्रभर असेच राहू द्या. ही प्रक्रिया काही दिवस पुन्हा करा.

कच्च्या बटाट्याचा ज्यूस : बटाट्याचा रस देखील डाग घालवण्यासाठी वापरता येतो. यासाठी कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढा. नंतर हा रस कॉटन बॉलने प्रभावित भागावर लावा. एक किंवा दोन तास तसंच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT