Life Hack sakal
लाइफस्टाइल

Clothes Without Iron: इस्त्रीशिवाय कपडे घालायला आवडत नाही? हे घरगुती जुगाड करतात कडक इस्त्री

कपडे प्रेस करणे हे सहसा मुलांसाठी फार त्रासाचे काम असते.

Aishwarya Musale

कपडे प्रेस करणे हे सहसा मुलांसाठी फार त्रासाचे काम असते. त्यातच बॅचलर मुलांना कपडे इस्त्री करायचे म्हटलं की, त्यांच्यासाठी हे फार बोअरिंग, वैतागाचे काम वाटते. घरापासून दूर राहणा-या मुलांसाठी तर प्रत्येक वेळी कपडे इस्त्री करणे सोयीचेही नसते. घरापासून दूर राहणारी मुलं हे समजू शकतात.

अनेकदा आपण कपडे इस्त्री करू शकत नाही आणि धोब्याकडे दिल्यानंतर ते कपडे आपल्याला आपल्या वेळेत मिळेल याची शाश्वती नसतेच ते येण्यासाठी २-३ दिवसांचा कालावधी लागतोच.पण तुम्ही काय कराल जेव्हा तुमचे कपडे प्रेस नाही झाले तर आणि लाईट गेली असेल तर? अनेकवेळा घरी लाईट असूनही इस्त्री खराब झाल्याने प्रेस करता येत नाही.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की असे काही सोपे उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे कपडे इस्त्री करू शकता इतकंच नाही तर त्यावर तुम्ही क्रीजही देऊ शकता. चला प्रेस करण्यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स जाणून घेऊया.

व्हिनेगरचा वापर- सर्वप्रथम एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात अर्धी बाटली व्हिनेगर आणि अर्धे पाणी मिसळा. आता तुमचे कपडे हँगरमध्ये लटकवा. नंतर स्प्रे बाटलीच्या साहाय्याने सर्व कापडावर फवारणी करा आणि कोरडे होऊ द्या. नंतर ते तुम्ही ते घालू शकता.

टॉवेलचा वापर- टेबलावर कापड पसरवा. आता टॉवेल ओला करून पिळून घ्या. आता तो कपडा टॉवेलच्या मदतीने प्रेस करा. अशा प्रकारे, संपूर्ण कापडाची क्रीजला प्रेस करा आणि सुकण्यासाठी हॅन्गरवर लटकवा.

किटलीचा वापर- किटली गॅसवर ठेवा आणि त्यात पाणी घाला. आता गरम किटली कपड्यांवर इस्त्रीप्रमाणे चालवा. थंड झाल्यावर पुन्हा गरम करा. काम सहज होईल

मॅट्रेस वापरणे- कापड सुकल्यानंतर काळजीपूर्वक दुमडून घ्या. आता ते गादीखाली ठेवा. फक्त 2 ते 3 तासांनंतर तुम्हाला दिसेल की कपडे पूर्णपणे ताजे दिसत आहेत. नंतर तुम्ही ते घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT