Tomato  sakal
लाइफस्टाइल

Tomato Storage Tips : टोमॅटो दिर्घ काळ टिकवून ठेवायचेत? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

सॅलडपासून ते जेवणात चव वाढवण्यासाठी टोमॅटो हा प्रत्येकाच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे.

Aishwarya Musale

टोमॅटोचे दर हल्ली खूप वाढले आहेत. मात्र टोमॅटोचा वापर केल्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होतच नाही. म्हणूनच हे टोमॅटो स्टोर करणं आता खूप आवश्यक झालं आहे. टोमॅटो साठवण्यासाठी बहुतेक लोक फ्रीज वापरतात. अर्थात फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवणे हा उत्तम पर्याय आहे.

परंतु तुम्ही रेफ्रिजरेटरशिवायही टोमॅटो जास्त काळ साठवू शकता. अशा वेळी काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही टोमॅटो खराब होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग जाणून घेऊया फ्रीजशिवाय टोमॅटो साठवण्याच्या टिप्स.

प्लास्टिक कंटेनर वापरा

अनेक वेळा लोक टोमॅटो स्टोर करण्यासाठी त्याला स्वयंपाकघरात ठेवतात. त्यामुळे स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे टोमॅटो लवकर खराब होऊ लागतात.

या प्रकरणात, आपण टोमॅटो स्टोर करण्यासाठी प्लास्टिक कंटेनर वापरू शकता. ज्यामध्ये हवा खेळती राहील अशा प्लास्टिकच्या डब्यात भरून घरातील थंड ठिकाणी ठेवा. यामुळे टोमॅटो लवकर खराब होणार नाहीत.

मातीची मदत घ्या

टोमॅटो स्टोर करण्यासाठी मातीचा वापरही उत्तम होऊ शकतो. जमिनीत ठेवल्याने बरेच टोमॅटो दिवस ताजे राहतात. यासाठी स्वच्छ कंटेनर धुवा आणि वाळवा. नंतर त्यामध्ये माती भरा आणि टोमॅटो या मातीत गाडून टाका.

पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, टोमॅटोमध्ये पाणी नसावे. तसेच टोमॅटो स्वच्छ आणि कोरड्या हातांनी बाहेर काढा.

ओपन बॉक्स

तुम्ही ओपन बॉक्समध्ये टोमॅटो देखील ठेवू शकता. यामुळे टोमॅटोवर हवा असेल आणि टोमॅटो लवकर खराब देखील होणार नाहीत. सगळ्यात पहिले म्हणजे कंटेनर आणि टोमॅटो सुकवण्यास विसरू नका. तसेच सूर्यप्रकाशाच्या संपर्कात कंटेनर वेळोवेळी ठेवा. कंटेनरमध्ये टोमॅटो त्यामुळे सुरक्षित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT