Summer Car Care Sakal
लाइफस्टाइल

Summer Car Care: उन्हाळ्यात करायची असेल कुल ड्रव्हिंग, तर आजच करा 'या' 5 गोष्टी

Summer Car Care: उन्हाळ्यात कारची काळजी घेतल्यास प्रवासात कोणतेही अडचण येणार नाही.

पुजा बोनकिले

summer car care tips driving important

संपूर्ण भारतात उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. देशातील विविध भागात तापमान वाढू लागले आहे. ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेतो तसेच कारची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला उन्हाळ्यात कुल ड्रव्हिंग करायची असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

  • टायर चेक करावे

उन्हाळ्यात प्रवाला जाण्यापुर्वी टायरची काळजी घ्यावी. उष्ण हवामानामुळे टायरमधील हेवचा दाब वाढून त्याचा परिणाम होऊ शकतो. टारमध्ये कमी हवा असेल तर इंधन जास्त खर्च होऊ शकते. हे टाळण्यासाठी टायची तपासणी करावी.

  • बॅटरी चेक करावी

कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल तर त्याची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. नेहमी प्रवासाला जाण्यापुर्वी कारचे इंजिन स्वच्छ करावे. तसेच सर्व कनेक्शन योग्यरित्या सुरक्षित आहे की नाही याची तपासमी करावी.

  • इंजिन तेलाची तपासणी

उन्हाळ्यात उष्ण तापमानामुळे अनेकदा इंजिन तेल लवकर जळते. इंजिन तेलाची पातळी नियमितपणे तपासणे आणि पॉवरप्लांटचे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी OEM ने शिफारस केल्यानुसार योग्य तेल घालणे महत्वाचे आहे. कारण इंजिन तेल वंगण म्हणून काम करते आणि गाडीच्या हलत्या भागांचे घर्षण होण्यापासून संरक्षण करते.

  • विंडशील्ड वाइपर चेक

पावसाळ्यात विंडशील्ड वायपर सर्वात प्रभावी असतात. उन्हाळ्यात ते थेट उष्णतेच्या संपर्कात येतात. यामुळे रबर कोरडे होतात. यामुळे विंडशील्डने काचा स्वच्छ होत नाही. यामुळे उन्हाळ्यात वायपरची देखील काळजी घ्यावी.

  • एसी

उन्हाळ्यात गोडीने प्रवास करताना सर्वात जास्त एसीचा वापर होतो. उन्हाळ्यात कार लवकर थंड होत नाही अशी तक्रार अनेक लोक करतात. ही समस्या टाळण्यासाठी कारमधील एअर फिल्टर स्वच्छ करणे गरजेचे असते. अन्यथा दुर्गंधी येऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! पुढील 5 दिवस काळजीचे... या जिल्ह्यांना रेड अलर्ट! मुंबई-पुण्याची परिस्थिती कशी असेल?

PM मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प अन् मेलोनींच्या रँकिंगमध्ये घसरण; कोण कितव्या स्थानी?

Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं

Latest Maharashtra News Updates : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latur Crime: ‘एचआयव्ही’बाधित मुलीवर अत्याचार; चार महिन्यांनी गर्भपाताचा आरोप, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT