Hair Care News  esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तूप आहे फायदेशीर, असा करा वापर

हिवाळ्यात कोरड्या केसांमुळे कोंड्याची समस्या निर्माण होते.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care News : हिवाळ्यात त्वचेसोबत आपल्याला केसांची ही विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये त्वचा जशी कोरडी पडते. तसेच, केस देखील कोरडे पडतात आणि जास्त फ्रिझी दिसू लागतात.

कोरड्या केसांमुळे कोंड्याची समस्या निर्माण होते. या कोंड्यामुळे केसांमध्ये सतत खाज येऊ लागते आणि केसांचा विचित्र वास देखील येतो.

त्यामुळे, ही कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण विविध प्रकारचे शॅंम्पू, केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करतो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की, तूपाचा वापर हा केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. हो तुम्ही वाचले ते खरे आहे. तूपामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

तूपामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अ‍ॅसिड्स समावेश असतो. त्यामुळे, केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

केसांतील कोंडा घालवण्यासाठी तूपाचा असा करा वापर

तूप आणि कडुलिंबाची पाने

कडुलिंब हे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानांमुळे केसांतील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी १०-१२ कडुलिंबाची पाने घ्या. ही पाने मऊ होईपर्यंत कोमट पाण्यात उकळून घ्या.

आता या पानांची बारीक पेस्ट करून ती तूपात मिसळा. ही पेस्ट आता केसांना लावा. २५-३० मिनिटे झाली की केस धुवून टाका.

गरम तूपाने करा केसांची मालिश

४-५ चमचे तूप घ्या. हे तूप वितळेपर्यंत गरम करा. जास्त ही गरम करू नका. तूप वितळले आणि नॉर्मल गरम झाले की गॅस बंद करा. आता तुमचे केस दोन विभागांमध्ये विभागून घ्या. आता १५ ते २० मिनिटे गरम तूपाने बोटांच्या सहाय्याने केसांची मालिश करा. 

तुमच्या स्काल्पला (टाळूला) मालिश करा आणि ज्या भागात जास्त कोंडा आहे, त्या भागात तूपाने जास्त मालिश करा. त्यानंतर, ३० मिनिटे तूप केसांमध्ये तसेच राहुद्या. त्यानंतर, केस स्वच्छ धुवून घ्या आणि केसांना छान कंडिशनिंग करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT