लाइफस्टाइल

उन्हाळ्यात घामापासून सुटका हवी, तर 'या' पाच आयडियाज् वापरा

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक ऋतुची (Seating In Summer) वेगवेगळी गरज असते. आपल्याबरोबर आपल्या घराचीही. ऋतुनुसार त्यात काही बदल करावी लागतात. सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे घरात हवा खेळती राहायला हवी. नाहीतर घामामुळे घरात राहणे अशक्य होऊन जाते. तसेच तुम्हाला ऋतुनुसार घरात काही बदल करायचे असेल तर सर्वप्रथम बैठक व्यवस्थेत बदल करा. थंड रंग आणि उन्हाळ्यातील पाच उत्कृष्ट सीटिंग आयडियाज् (Seating Ideas) तुम्हाला कामाला येऊ शकतात. (Ideas Of Summer Seating For Coolness) तर चला जाणून घेऊ या...

१. हॅमक (जाळीदार झोपाळा) : तुम्ही बऱ्याचदा घराबाहेर जाळीदार झोपाळा पाहिला असेलच. बहुतेक ती घराबाहेरच दिसतात. मात्र झोपाळा घराबाहेरच असावा अस काही नाही. तुम्ही घरातही लावू शकता. जर तुमच्या घराच्या आत खूप जागा असेल तर या आरामदायी बैठक व्यवस्थेचा विकल्प वापरायला हरकत नाही. ते तुम्ही लिव्हिंग किंवा बेडरुमच्या मोठ्या खिडकीसमोर लावू शकता. त्यानंतर खिडकी उघडून झोपाळ्यात पडून थंड हवेचा आनंद घेऊ शकता.

२.बिन बॅग्स : उन्हाळ्यात एकाच ठिकाणी खूप वेळ बसणे शक्य होत नाही. सारखी जागा बदलूशी वाटते. काही वेळेस निवांत पडावेसे वाटते. त्यासाठी तुम्हाला बीन बॅग्स कामाला येऊ शकते. ते घरात कुठेही ठेवून त्यावर आराम करु शकता.

३.झोपाळा : झोपाळा म्हटलं की बऱ्याच जणांना लहानपणाची आठवण आली असेल. घरात सहज ठेवता येईल असा झोपाळा खरेदी करा. उन्हाळ्यात दुपारी झोपाळ्यावर बसून आपल्या लहानपणाचे दिवस आठवू शकता.

४.बांबूपासून बनवलेले फर्निचर : बांबूपासून बनवलेल्या फर्निचरला उन्हाळ्यात पसंती असते. ते पाहण्याबरोबरच, टिकाऊही असतात. त्यांची स्वच्छता ठेवणेही सोपे असते. उन्हाळ्यात बांबपासून बनवलेल्या फर्निचरपासून थंडावा मिळतो.

५.लाकडाचे फर्निचर : लाकडाचे फर्निचर पाॅलिश्ड असो किंवा अनपाॅलिश्ड तुमच्या घराला लगेच आकर्षण प्रदान करते. ती घराला व्हिंटेज लूक देतात. एक चांगली गोष्ट म्हणजे ती पूर्ण पर्यावरणस्नेही असतात. लाकडाचे आकर्षक फर्निचर घराला पर्सनलाईज्ड आणि चांगल लूक देण्यात मागे नसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT