नागपूर : माझा मुलगा तर खुप शांत होता. एवढा कसा काय चिडखोर झालाय? आजकाल त्याचे वागणे आकलनपलीकडचे होत आहे, अशा तक्रारी आजकाल वाढत आहेत. पण मुलांच्या वर्तनामागे बऱ्याचदा त्याच्याभोवती असलेली परिस्थिती कारणीभूत असते. कारण मुले-मुली कुटूंब अथवा समाजात घडणाऱ्या गोष्टींचे अनुकरण करीत असतात. त्यात चांगले आणि वाईट आलेच. आई-वडील मुलांना कधीच अयोग्य संस्कार देत नाहीत. पण मुले-मुली नक्कलबाज असतात. त्यामुळे त्यांच्यासमोरचे पालकांचे वर्तन हे स्वच्छ असायला हवे. त्यासाठी पालकांनी कुटूंब आणि समाजात वागताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, त्यांच्यासमोर नवी पिढी घडत असते. वाढते असते. आई-वडिलांनी खालील गोष्टी टाळायलाच हव्यात.
व्यसन टाळा
सामान्यतः पुरुष वर्गाला खर्रा, तंबाखू, सिगारेट आणि दारूचे व्यवसन असते. महत्वाचे म्हणजे लहान मुलांचा आई पेक्षा बाबांकडेच जास्त ओढा असतो. अशात अनेकदा वडिल मुलांसमोरच सिगारेटचा झुरका घेतात किंवा दारूची चुस्की घेतात. वाढत्या वयात मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीचे कुतुहल असते. त्यामुळे वडिलांसारखेच मादक पदार्थ घेण्याचा ते प्रयत्न करू शकतात. कोवळ्यावयातील मुलांवर या पदार्थांचा दुरगामी परिणाम होऊ शकतो. त्यांना विविध शारिरीक आजार होणाच्या धोका असतो.
जरा इकडेही लक्ष द्या!
अनावश्यक गॉसिपिंग टाळा
मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा
नियमीत लवकर उठा, रात्री लवकर झोपा
टीव्ही मोबाईला लिमिटेड वापर
शक्यतो रोज व्यायाम करा
वेळेवर जेवण करा
अपशब्दांचा उच्चारही नको
आई-वडील नकळत अपशब्दांचा वापर करताता. हे शब्द जरा वेगळे वाटत असल्याने मुले नेमका तोच शब्द पकडतात आणि व्यवहारात आणतात. म्हणून मुलांसमोर बोलताना नेहमी दक्ष असावे आणि तोलून-मापून बोलावे.
घरात वादविवाद, भांडण नकोच
अज्ञान म्हणा की अन्य कारण असो, पालकांनी घरात भांडू नये. कारण अशा घटनांचा मुलांच्या कोवळ्या मनावर विपरित परिणाम होत असतो. अशा घरातील मुले शाळेतही सतत घरातील भांडणांचा विचार करीत असतात. परिणामी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा निर्माण होतो किंवा मुलेही मोठी झाल्यावर भांडखोर होतात.
मुलांमध्ये कम्पॅरिजन का करता?
स्वतःच्या मुलाशी दुसऱ्याशी तुलना करण्याची सवय अत्यंत वाईट आहे. कारण प्रत्येक मुलगा अथवा मुलगी इतरांपेक्षा वेगळे असतात. तुलना केल्यामुळे मुलांवर मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो. त्याऐवजी मुलांचे वेळोवेळी कौतुक करताना अपयशाच्या वेळी धीर द्यावा.
''पालकांनी कामाच्या व्यापातून वेळ काढावा. कमीत कमी काही वेळ तरी मुलांसोबत घालवावे. या दरम्यान त्यांच्याशी बोलावे. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रत्येक शंकांचे निरसन करावे. मुलं पालकांच्या प्रत्येक गोष्टी आणि हालचालींचे अनुकरण करतात. म्हणून आपल्या वागण्यातील चुका ओळखून त्या त्वरित दूर करण्याचा प्रयत्न करावा.''
-डॉ. सुषमा देशमुख, स्त्रीरोग तज्ञ, वंध्यत्व तज्ञ नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.