Internet Sakal
लाइफस्टाइल

International Internet Day | जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, महत्व

सकाळ डिजिटल टीम

International Internet Day 2021 : सध्याच्या जगात इंटरनेट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे. माहिती ते मनोरंजन सर्व गोष्टींसाठी सध्या इंटरनेटची आवश्यकता पडते. इतकेच नाही तर हे इंटरनेट हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरुपात आज भारतीय अर्थव्यवस्थेत वार्षिक 7.10 लाख कोटी रुपयांचे योगदान देत आहे. शेकडो लोकांच्या उत्पन्नाचे इंटरनेट साधन बनले आहे,

'इंटरनेट डे' चा इतिहास

आंतरराष्ट्रीय इंटरनेट डे दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. अणुयुद्धाच्या प्रसंगी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकन सैन्यासाठी संगणक नेटवर्क तयार करण्यात आले तेव्हा 1969 मध्ये इंटरनेटचा उगम झाला. इंटरनेटला ARPANET (Advanced Research Projects Agency Network) म्हणून ओळखले जात असे. चार्ली क्लाइनने 29 ऑक्टोबर 1969 रोजी पहिला इलेक्ट्रॉनिक संदेश प्रसारित केला आणि 2005 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस साजरा करण्यात आला.

इंटरनेटमुळे लाखोंचे जीवन सुकर

विज्ञान, अभ्यास, व्यवसाय, नोकरीचा शोध, सरकारी कामे, बिल भरणे, बँकिंग व्यवहार, पत्रव्यवहार, संभाषण, तिकीट खरेदी, हवामानाची माहिती, मनोरंजन, व्हिडिओ फिल्म, फोटो, स्टोरी, विनोद, कॉमेडी, चित्रपट, बातम्या अशा असंख्य गोष्टी विज्ञानामुळे आपल्या तळहातात आल्या आहेत. आज आपण परदेशातील वर्तमानपत्रे, मासिके आणि सिनेमे यासारख्या शेकडो गोष्टी आपणल्याल घरबसल्या मिळतात हे सर्व इंटरनेटमुळे उपलब्ध झाले.

अर्थव्यवस्थेत इंटरनेटचे योगदान

आज जगात 3.9 अब्ज लोक इंटरनेट वापरतात. भारतात इंटरनेटचे 56 कोटी वापरकर्ते आहेत. 2018 मध्ये जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 51.2 टक्के होती. 1995 मध्ये फक्त 1.6 कोटी लोक ऑनलाइन होते. इंटरनेटचे भारतीय अर्थव्यवस्थेत वार्षिक 7.10 लाख कोटींचे योगदान आहे. भारतातील सायबर अॅडिक्शनवर केलेल्या सर्वेक्षणानुसार, 18 ते 30 वयोगटातील 5 पैकी 3 तरुण असे आहेत की, ते त्यांच्या स्मार्टफोनशिवाय खूप अस्वस्थ होतात. यापैकी 96 टक्के लोक सकाळी उठतात आणि आधी सोशल मीडियावर जातात. ई-मेल आणि सोशल मीडिया पाहिल्याशिवाय राहू शकत नाही, असे ७० टक्के तरुणांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT