Women careful using mobile
Women careful using mobile sakal
लाइफस्टाइल

महिलांनो मोबाईल वापरताना काळजी घ्या...

पोपट पाटील

इस्लामपूर: गृहिणीपासून नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मोबाईल महत्त्वाचे डिव्हाईस ठरले आहे. परंतु, हाच मोबाईल वापरताना आपण योग्य काळजी व खबरदारी घेतली नाहीतर महिलांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. स्मार्ट फोन म्हणजे मोबाईल ही चैनीचे नव्हे; तर गरजेचे गॅझेट झाले आहे. मोबाईल म्हणजे संगणकाचे प्रतिरूपच आहे.

महिलांसाठी माहितीची देवाण-घेवाण, सोशल मीडियाचा वापर यापासून ते ई-मेल आयडीसाठी मोबाईल महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. याचा वापर करताना योग्य ती काळजी, खबरदारी घेणे गरजेचे आहे, अन्यथा कठीण प्रसंग उभा राहू शकतो. याचबरोबर आर्थिक नुकसानही होऊ शकते.

ही घ्या काळजी

वैयक्तिक माहिती : आपले नाव, जन्मतारीख, लिंग, राहण्याचे ठिकाण, शाळेचे नाव, ई-मेल आयडी, कामाचे ठिकाण आणि स्वतःचा फोटो यासारखी वैयक्तिक माहिती कोणाला द्यावी याबाबत जागरूकता हवी.

सोशल मीडियावर फोटो टाकताना : फोटो कोण बघू शकतील याबाबत जागरूक रहा. सोशल मीडियावरील गोपनीयता सजगतेने जपली पाहिजे. तुम्हाला हव्या असलेल्या ठरावीक लोकांनाच ती माहिती दिसेल हे खात्रीपूर्वक पहावे. ज्या मांडळीशी संपर्क नसावा असे वाटते त्यांना ब्लॉक करावे.

व्हॉटस् ॲपवर राहा सावधान : व्हॉटस् ॲप किंवा इतर मेसेजिंग ॲपमधून मीडिया ऑटो डाऊनलोड काढून टाकावे. तुमच्याशी अपरिचित व्यक्तीच्या संदर्भात तर हे टाळावेच.

पासवर्ड वेगवेगळे ठेवा : वेगवेगळ्या अकाउंटसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवावेत. वेळोवेळी तुमचे इंटरनेटवरील कॉन्टॅक्स तपासत राहावे.

कोणाच्या तरी ओळखीचा मित्र-मैत्रीण म्हणून अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. कोणत्याही फसव्या अामिषाला बळी पडून व्यक्तिगत माहिती देऊ नका. पासवर्ड किंवा ओटीपीसारखी गोपनीय माहिती शेअर करू नका. मोबाईल नंबर, ई- मेल आयडी आदी माहिती सोशल नेटवर्किंग साईटवर टाकू नका. आवश्यक असेल तरच मोबाईलचा वापर करा.

- नीलम जाधव, पोलिस उपनिरीक्षक, इस्लामपूर पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT