History Of Sabudana:  Sakal
लाइफस्टाइल

History Of Sabudana: उपवासाच्या साबूदाण्याने चक्क वाचवले होते लाखो लोकांचे प्राण, काय घडलं होतं नेमकं?

Sabudana:जाणून घ्या कसा होता साबूदाण्याचा ब्राझील ते केरळ प्रवास

पुजा बोनकिले

know amazing history of Sabudana sago read full story

चैत्र नवरात्री 9 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अनेक लोक उपवास करतात. उपवास असला की अनेक लोक साबुदाणा खिचडी खातात. तर अनेक लोक खिचडीच खायला मिळते म्हणून उपवास करतात. भारतात उपवासादरम्यान अनेक लोक साबूदाणा खिचडी खातात. साबूदाण्यापासून खिचडीच नाही तर थालीपीठ, वडा आणि खीरसुद्धा उपवासाला बनवली जाते. साबूदाण्याचे हे मोत्यासारखे पांढरे दाणे कसे तयार होतात हे जाणून घेऊया.

साबूदाणा हे सुपरफूड असल्याची चर्चा काही काळापासून सुरू असली, तरी साबूदाणा खिचडीमध्ये भाजलेले शेंगदाणे, बटाटे, भिजवलेला साबूदाणा, हिरव्या मिरच्या टाकून स्वादिष्ट खिचडी बनवली जाते. पण तुम्हाला माहितीय का या साबूदाण्यामुळे एके काळी लाखो लोकांचा जीव वाचवला होता, तसंच संकटाच्या परिस्थितीत उदरनिर्वाहाचा एकमेव स्त्रोत म्हणून साबूदाण्याकडे पाहिलं जात होतं.

  • ब्राझील ते केरळ प्रवास

साबूदाण्यापासून बनवलेले पदार्थ खायला चवदार असतात. पण साबुदाणा बनवण्याची प्रक्रिया खुप अवघड आहे. टॅपिओका हा कसावा वनस्पतीच्या कंदमुळापासून काढलेला स्टार्च आहे. साबूदाणा बनवण्याची पहिली पायरी म्हणजे पांढऱ्या दुधासारखा पदार्थ काढण्यासाठी कंदमुळांची स्वच्छता करून बारिक पावडर केली जाते.

हि पावडर काही तास ठेवल्यानंतर शुद्ध केली जाते. नंतर ते मशीनच्या मदतीने लहान मोत्यासारख्या गोलाकार दिला जातो. पुढील पायरी म्हणजे साबूदाणा वाफवून, भाजून किंवा वाळवून तयार केला जातो. या प्रक्रियेच्या शेवटी दुधाळ-पांढरा रंग मिळविण्यासाठी पॉलिश केले जाते.

पण आपल्यापैकी अनेकजण साबुदाणा हा भारताच्या मध्य आणि उत्तरेकडील भागांमध्ये जास्त खाल्ला जातो असे म्हणतात. पण टॅपिओका हा कसावा वनस्पतीची मूळ प्रजाती ब्राझीलमध्ये आहे. पण ते दक्षिण भारतीय राज्यात मुख्य कसे बनले हे जाणून घेऊया.

Tapioca Starch
  • काय आहे इतिहास

सांगितलेल्या इतिहासानुसार , 1800 च्या शतकात त्रावणकोर संस्थानात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा अयल्यम थिरुनल रामा वर्मा हे त्यावेळेस तिथले शासक होते. त्यांनी त्यांचा भाऊ युवराज विशाखम थिरुनल महाराजाच्या मदतीने लोकांना दुष्काळाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी अनेक उपाय केले. यामध्ये त्यांनी टॅपिओका कसावा वनस्पतीच्या कंदमुळाचा वापर केला होता.

विशाखम राजाचा सर्वात धाकटा भाऊ वनस्पतिशास्त्रज्ञ होता आणि त्याने टॅपिओकाच्या गुणधर्मांचा शोध लावला. यामुळे त्रावणकोरला दुष्काळाच्या समस्येतून वाचण्यास मदत झाली. तरीही अशा भिषण परिस्थितीत लोक हे विदेशी कंदमूळाचा आपल्या आहारात समावेश करण्यास संकोच करते होते.

History Of Sabudana

कारण त्यांना ते विष आहे असी भीती वाटत होती. यावर उपाय म्हणून विशाखमने त्याच्या उत्तराधिकारी नंतर, टॅपिओका विशिष्ट प्रकारे शिजवून त्याला शाही जेवणाचा एक भाग म्हणून सेवा देण्याच्या सूचना जारी केल्या. लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षित वापराबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशी सुचना दिली. या सूचनांनुसार, संपूर्ण प्रक्रियेची पुनरावृत्ती करण्यापूर्वी टॅपिओका पूर्णपणे स्वच्छ करून उकळवावे लागेल आणि पाणी टाकून द्यावे लागेल. हे सुनिश्चित करण्यासाठी होते की अंतिम उत्पादन, ज्याला कप्पा म्हणून ओळखले जाते.

नंतर, टॅपिओका कंदमुळ देखील दुस-या महायुद्धानंतर पीडित लोकांसाठी एक विश्वासार्ह आणि पौष्टिक पदार्थ बनला. ज्या वेळी तांदूळ हे महागडे अन्न बनले आहे, तेव्हा लोक त्यांच्या जेवणात मुख्य भाग म्हणून कप्पावर अवलंबून असत. ही प्रथा आजही केरळच्या पारंपारिक पाककृतींमध्ये सुरू आहे. वर्षानुवर्षे, कप्पाची लोकप्रियता वाढली असताना, काही वर्षांनीच साबुदाणा हे भारतातील सामान्य खाद्यपदार्थ बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT