Weight Loss esakal
लाइफस्टाइल

Weight Loss : काॅफी अन् लिंबाच्या काॅबिनेशनने वजन कमी होते का?

तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

ब्लॅक काॅफीमध्ये लिंबाचा रस टाकून पिल्यास वजन गतीने कमी होण्यास मदत होते. सोशल मीडियावरील एका दाव्यानुसार लेमन काॅफी सेवन केल्याने सात दिवसांत तुम्ही वजन कमी करु शकता का? याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? नारायणा सुपरस्पेशलिटी हाॅस्पिटलचे सीनियर डायटीशियन डाॅ. परमित कौर म्हणाले, जर तुम्ही दुधवाली काॅफीत लिंबाचा रस टाकल्यास ते दुधाचे पूर्ण पोषण नष्ट करते. त्यातून कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे जर तुम्ही पूर्ण निरोगी असाल तर दुधवाली काॅफीत थोडे लिंबू पिळून पिऊ शकता. याने कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र जी लोक किडनीचे रुग्ण आहेत त्यांनी हे टाळावे. तज्ज्ञानुसार, विनादुधाचा गरम चहा किंवा काॅफीत लिंबाचा वापर फॅट कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र या बरोबरच तुम्हाला इतर आरोग्यदायी सवयींचा अवलंब करावा लागेल. (Weight Loss)

त्याने वजन कमी होण्यास मदत होईल. दुसरीकडे फोर्टिस एस्काॅर्ट्स हाॅस्पिटल, जयपूरचे आहारप्रमुख अंशुल चतुर्वेदी म्हणतात की सध्या तरी लेमन काॅफीवर कोणतेही संशोधन झालेले नाही. त्याचे कोणतेही शास्त्रीय प्रमाण नाही. त्यामुळे आता त्यावर काही म्हणता येऊ शकत नाही. चतुर्वेदी म्हणतात, की काॅफीचे सेवन अधिक प्रमाणात करु नये. जास्त प्रमाणावर काॅफी घेतल्याने डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोकदुखीसारख्या समस्या होऊ शकतात. या व्यतिरिक्त जेव्हा अॅसिडिटी असणारे लोक लिंबाचा अधिक सेवन करतील तेव्हा त्यांची अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. अशा स्थितीत जेव्हा दोन्ही एकत्र केले जातात. त्याने कोणतेही अतिरिक्त लाभ मिळत नाही. त्यामुळे कोणी काही तरी सांगतो यावर विश्वास न बसता तज्ज्ञ काय म्हणतात याकडे लक्ष द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT