Kolhapuri Chappal  esakal
लाइफस्टाइल

Kolhapuri Chappal : Western लुकवर कोल्हापुरी चप्पल शोभत नाही, म्हणणाऱ्यांनी ही डिझाईन्स पहाच!

कोल्हापुरी चपला आरामदायक असतात त्यामुळे पायांची काळजी घेतली जाते

Pooja Karande-Kadam

Kolhapuri Chappal : पुरुष असो वा महिला दोघेही फॅशन ट्रेंडची काळजी घेतात. आपण काही आऊटडेटेड परिधान केलं नाहीय ना याचा विचार ते प्रत्येक गोष्ट घेताना केला जातो. तसाच हा विचार नवे शूज, चपला घेताना देखील करतात. चपलांमध्ये कोल्हापुरी चप्पल हा एक ब्रँड आहे.

ज्यात महिला-पुरूष दोघांसाठीही वेगवेगळ्या व्हरायची असतात. पण आताच्या जमान्यात फॅशनेबल कपड्यांवर कोल्हापुरी चपला शोभून दिसत नाहीत. असं त्यांच मत आहे. स्त्रियांचा विचार केला तर प्रत्येक पोशाखासोबत मॅचिंग सँडल आणि चप्पल शोधतात, तर पुरुषांना त्यांचे शूज आणि चप्पल आवडतात.

परंतु फॅशनच्या नादात आपण आपल्या आरोग्याची आणि आरामाची काळजी घेणे विसरतो. पण कोल्हापुरी चपला आरामदायक असतात त्यामुळे पायांची काळजी घेतली जाते.  

कोल्हापुरी चप्पलचा आरोग्याशी काय संबंध असू शकतो? वास्तविक, कोल्हापुरी चप्पल समोरून उघड्या असतात, त्यामुळे ते तुमच्या नखांना आणि बोटांना खूप आराम देतात. तसेच या चपला चामड्याच्या बनवल्या जातात त्यामुळे शरीरातील उष्णता शोषून घेण्याचे कामही कोल्हापुरी चपला करतात.

पण आजच्या फॅशन ट्रेंड्समध्ये कोल्हापुरी चपला शोभून दिसत नाहीत असे म्हटले जाते. सहसा ते घेण्याचा कोणी विचार करत नाही. पण जसे ट्रॅडिशनल वाटणाऱ्या साडीला फ्युजन लुक देऊन तिचा पैठणी ड्रेस अन् वेस्टर्न स्टाईल कपडे शिवले जातात.

तसेच कोल्हापुरी ब्रँडला वेस्टर्नचा तडकाही दिलेला आहे. आज अशाच काही चपलांच्या डिझाईन्स आपण पाहुया ज्या तुम्ही वेस्टर्न, ट्रॅडिशनल अशा लुकवर कॅरी करू शकता.

कोल्हापुरी ब्रँंडमधील मॉडर्न लुक चप्पल

पुरूषांना ऑफिस युजसाठी अशा पद्धतीच्या चपला हव्या असतात. ज्या त्यांच्या पायांना दिवसभर आराम देऊ शकतात. तसेच, ज्यांना शूज घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय ठरू शकेल. काळ्या आणि तपकिरी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असलेल्या या

कोल्हापुरी चप्पल अतिशय आरामदायक आहेत. जर तुम्ही नीट बघितले तर त्यावर खूप चांगले डिटेलिंग देखील केले गेले आहे. महिलांसाठी ही कोल्हापुरी चप्पल खूपच स्टायलिश आणि सुंदर आहेत. जर तुम्ही एथनिक स्टाईलवर कॅरी करण्यासाठी आरामदायक आणि स्टाइलिश चप्पल शोधत असाल तर ही चप्पल तुमच्यासाठी बेस्ट आहेत. 

पुरूषांसाठी हे ऑफिस युज चप्पल ट्रेंडी आहे

ही कोल्हापुरी चप्पल खूप मजबूत आणि टिकाऊ आहे. याशिवाय, त्याचा तपकिरी रंग आणि डिझाइन देखील याला बर्‍याच प्रमाणात आधुनिक टच देत आहे. या चप्पलचा सोल लेदरचा बनलेला आहे, ज्यामुळे तुमचे चप्पल जास्त काळ टिकेल. ही चप्पल तुम्ही ऑफिसमध्ये घालू शकता.

आरामदायक असलेली लेडिज कोल्हापुरी चप्पल

या सणासुदीच्या काळात तुम्हाला काम करताना तुमचा सण आरामात साजरा करायचा असेल तर या चप्पलांना तुमच्या कलेक्शनचा एक भाग बनवा. तुम्हाला या कोल्हापुरी चप्पल बेज रंगात मिळत आहेत, ज्यावर अतिशय सुंदर आणि तपशीलवार डिझायनिंग करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT