लाइफस्टाइल

शेवटी आईच 'ती'; बाळाला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत केली झटापट

शर्वरी जोशी

'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही', असं म्हणत कायमच म्हटलं जातं आणि ते काही अर्थी खरंदेखील आहे. कारण, एक आई आपल्या मुलांसाठी कायम अनेक गोष्टींचा त्याग आणि तडजोड करत असते. विशेष म्हणजे आईची ही माया प्राण्यांमध्येदेखील पाहायला मिळते. सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्येच सध्या एक बिबट्या आणि  याक यांच्या झटापटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात आपल्या बाळाला वाचवण्यासाठी एक याक थेट बिबट्याला भिडल्याचं पाहायला मिळत आहे.

आयएफएस ऑफिसर सुरेंद्र मेहरा यांनी ट्विटरवर बिबट्या आणि याक यांच्यातील झटापटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी याक जीवाची पर्वा न करता बिबट्यासोबत लढाई करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत, जंगलात जीवन जगताना समानता दिसून येते. त्याचसोबत शिकार आणि शिकारी यांच्यासाठी अनेक संकंटदेखील समोर येत  असल्याचं पाहायला मिळतं, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या याकची शिकार करण्यासाठी दबा धरुन बसला होता. बिबट्याला पाहताच तेथील सगळे याक सैरावैरा पळू लागले. याकला पळतांना पाहून बिबट्याने एका याकवर हल्ला केला. विशेष म्हणजे आपल्या पिल्लावर झालेला हल्ला पाहून एक याक धावत आला आणि त्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केला. यात याक आणि बिबट्यामध्ये झटापट झाली आणि अखेर बिबट्याने हार मानून तेथून पलायन केलं.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोबतच एक आई आपल्या पिल्लासाठी प्राणांची आहुतीदेखील तयार झाल्याचं पाहून अनेकजण या याकचं कौतुक करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: 'हिजाब घालणे' इस्लामिक श्रद्धेचा अनिवार्य भाग नाही; हायकोर्टाचा मोठा निकाल, याचिका फेटाळली

Gokul Election 2026 : 'गोकुळ' बिनविरोध होणार नाहीच! आमदार सतेज पाटील यांचा महायुतीला थेट इशारा, ताकदीने लढण्याची घोषणा

स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचताच सिद्धार्थ जाधव भडकला, म्हणाला...'कसली घाई आहे यांना...'

Marathi News Live Updates : राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे कसे?; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा

Raju Shetti: ‘श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रयत्न’; राजू शेट्टींचा गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT