Face Glowness
Face Glowness 
लाइफस्टाइल

चांगल्या त्वचेसाठी घरच्या घरी बनवा दही आणि अॅलोव्हेरा जेलचे मिश्रण

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - दही आणि अॅलोव्हेरा जेल एकत्र करुन घरच्या घरी चांगल्या प्रकारचे मिक्स तयार केले जाऊ शकते. जे तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा त्वचेवरील गोरेपणा देईल. जो नेहमी राहील. त्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. ते सर्व तुमच्या स्वयंपाक घरात मिळेल. कोणत्याही रसायनविना तुमची त्वचा खुलून दिसेल. दहीपासून तयार होणाऱ्या अशाच सौंदर्यप्रसाधनाविषयी सांगणार आहोत. जे केवळ दोन वेळा वापरल्यावर त्वचेवर नवीन चमक दिसते. जाणून घ्या दही मिक्स कसे बनवायचे आणि त्वचेवर लावयचे आहे. 

मसाला नव्हे 
हळदी हे केवळ मसाला नाही तर एक आयुर्वेदिक औषध आहे. ती केवळ आरोग्य नव्हे तर तुमच्या त्वचेचीही काळजी घेते. ती पिंपल्स आणि त्याचे स्पाॅट्स कमी करण्याबरोबरच त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत करते. हळदीने अप्रतिम फेसपॅक बनवण्याची कृती अशी ...
तुम्हाला हे साहित्य हवे 
- अॅलव्हेरा जेल
- हळदी पावडर
- दही

अशी तयार करा मॅजिकल मिक्स्चर
सर्वप्रथम एक प्लेटमध्ये १-२ चमचे ताजे दही घ्या. त्यात एक चिमूटभर हळदी टाका. दही त्वचेच्या आत जाऊन स्वच्छता करते आणि त्वचेला कोमल पणा देऊन चिरापासून वाचवते. यातील लॅक्टस त्वचेला उजळण्याचे काम करते. दुसरीकडे हळदीतील अँटीआॅक्सिडेंट त्वचेला संरक्षम देते. हळदी त्वचेचा रंग चांगला ठेवण्यास काम करते. 

लावा असे
फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा हर्बल फेसवाॅशने धुवा. तयार फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर लावा. वाळेपर्यंत फेसपॅक लावा. पुन्हा चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. फेसपॅक स्वच्छ केल्यानंतर तुम्ही त्वचेला थंडपणा देण्यासाठी हळदी जेलही बनवू शकता. 

असा बनवा घरगुती कुलिंग जेल 
हे बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये एक टेलबस्पून अॅलव्हेरा जेल घ्या. त्यात एक चिमूटभर हळदी टाका. बस्स तयार तुमचे स्किन कुलिंग जेल. कोरड्या त्वचेसाठी हे खूप गुणकारक आहे. हे जेल पूर्ण चेहऱ्याला लावा. आता हळूहळू मसाज करा. पुन्हा ५-१० मिनिटांपर्यंत मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. जर तुमची त्वचा खूप संवेदनशील नसेल तर तुम्ही हे रात्रभरही लावून ठेवू शकता. सकाळी तुमची त्वचा कोमल आणि उजळलेली दिसेल. 

दह्याची मसाज
दहीने तुम्ही प्रत्येक दिवशी केवळ पाच ते दहा मिनिटांचे मसाज चेहरा आणि गळ्यापर्यंत केल्यास त्वचेवर उष्णता, उन्ह आणि गरम हवेचा कोणताही परिणाम होणार नाही. यासाठी तुम्हाला केवळ दोन चमचे दहीच लागेल. लक्षात ठेवा चेहरा स्क्रब किंवा मसाज करण्यापूर्वी फेसवाॅश जरुर करुन घ्यावे. यामुळे चेहरा स्वच्छ होईल. 

गोरेपणा आणि हायड्रेट बनेल त्वचा
दही मिक्स, स्किन कुलिंग जेल आणि दही मसाज तुम्ही आठवड्यात तुमच्या सोईनुसार वापरु शकता. या तिन्ही पद्धतीमुळे उन्हाळ्यात त्वचेचा बचाव होऊ शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT